चित्रपटातील अॅक्शन सीन आणि स्टंटसाठी प्रसिद्ध असलेला दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या आगामी चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर रोहित शेट्टीने रणवीर सिंगची पुढील चित्रपटासाठी निवड केली. या चित्रपटाबद्दल अधिक माहिती मिळालेली नाही. पण लवकरच त्याचे चित्रीकरण सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. रणवीर सिंग सध्या आदित्य चोप्रा याच्या ‘बेफिकरे’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. आदित्य चोप्रा सुमारे सात वर्षांनंतर एक नवा चित्रपट घेऊन येतो आहे. रणवीर सिंगच्या सोबत या चित्रपटामध्ये अभिनेत्री वाणी कपूर दिसणार आहे. २०१३ मध्ये ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
अॅक्शन सीन आणि स्टंट्समुळे बॉलिवूडमध्ये रोहित शेट्टीच्या चित्रपटाचा वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. त्यामुळे त्याच्या या नव्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांनाही उत्सुकता लागली आहे.

Story img Loader