पीटीआय, कोलकाता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार दीर्घकाळ टिकणार नाही आणि ते लवकरच कोसळेल, असे प्रतिपादन केले. हे सरकार दहशत निर्माण करून आणि धमक्या देऊन निर्माण झाले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

तृणमूल काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘शहीद दिन’ रॅलीला संबोधित करताना बॅनर्जी यांनी कोणाचेही नाव न घेता केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारमधील भाजपच्या मित्रपक्षांवर आर्थिक फायद्यासाठी कथित मंत्रीपदांचा त्याग केल्याबद्दल टीका केली. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने चांगली कामगिरी केल्याबद्दल कार्यक्रमाला उपस्थित असलेले समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे बॅनर्जी यांनी कौतुक केले. केंद्रातील सरकार फार काळ टिकणार नाही. हे स्थिर सरकार नाही आणि लवकरच कोसळेल, असे ममता म्हणाल्या.

हेही वाचा >>>देणग्या ताब्यात घेण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात निवडणूक रोख्यांसंबंधीच्या याचिकांवर आज सुनावणी

रालोआतील घटक पक्षांवर टीका

रालोआतील भाजपचे मित्रपक्ष भित्रे आणि लोभी आहेत. ते आर्थिक प्रभोभनाला बळी पडले आहेत. मंत्रालयाऐवजी पैशाचा प्रस्ताव दिल्याचे कोणी ऐकले आहे का? मात्र भाजपच्या भित्र्या व लोभी मित्रपक्षांनी स्वत:च्या स्वाभिमानाचा त्याग केला आहे, अशी टीका बॅनर्जी यांनी केली

अखिलेश यादव यांचे कौतुक

‘शहीद दिन’ रॅलीला उपस्थित असलेल्या अखिलेश यादव यांचे कौतुक करताना बॅनर्जी म्हणाल्या, ‘‘तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये खेळलेला खेळ या राज्यातील सरकारला राजीनामा देण्यास भाग पाडेल. मात्र यंत्रणांचा गैरवापर करून भाजप सरकार सत्तेत आहे. परंतु यंत्रणांचा अशा प्रकारे गैरवापर करून तुम्ही आम्हाला घाबरवू शकत नाही.’’