खासगी शाळेतील नर्सरीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या स्कूल बस चालकाच्या बेकायदेशीर घरावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. आरोपीने स्कूल बसमध्येच साडे तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केला होता. भोपाळमधील या घटनेनंतर सर्वसामान्यांमध्ये प्रचंड संताप आहे.

आरोपी चालकाने शाहपुरा परिसरातील वसंत कुंज कॉलनीतील भागावर अतीक्रमण करत घर बांधलं होतं. कारवाईच्या आधी घर रिकामं करण्यात आलं होतं. पोलीस, महापालिका आणि महसूल विभागाने एकत्रितपणे कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सांगलीत चार साधूंना बेदम मारहाण; पालघर घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात टळली

दरम्यान जिल्हाधिकारी अविनाश लवानिया यांनी विद्यार्थिनींना घेऊन जाणाऱ्या बसेसमध्ये महिला कर्मचारी तैनात करण्याचा तसंच सीसीटीव्ही अनिवार्य करण्याचा आदेश दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा प्रशासन जबाबदार असेल आणि जर काही निष्काळजीपणा केल्याचं आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण?

भोपाळमध्ये एका नर्सरीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बस चालकाने बसमध्येच बलात्कार केला. यावेळी महिला कर्मचाऱ्याने त्याची मदत केली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मुलीच्या अंगावर जखमांच्या खुणा दिसल्यानंतर आईने विचारणा केली असता ही घटना उघडकीस आली. मुलीने सर्व घटनाक्रम सांगितल्यानंतर, कुटुंबाने शाळा प्रशासन आणि पोलिसांकडे यासंबंधी तक्रार केली.