Rape in Goa : देशातील विविध राज्यांत सातत्याने महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. तसंच, अल्पवयीन मुलींवरील लैंगिक शोषणाचे प्रकारही वाढले आहेत. आता गोव्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका चार वर्षी मुलीवर एका तरुणाने बलात्कार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पीडित मुलगी युरोपिअन असून तिचं कुटुंब सातत्याने भारतात येत होतं. त्यामुळे ते आता गोव्यात कायमचे स्थायिक झाले होते. त्यांच्या घराशेजारीच एक बिहारचं कुटुंब राहत होतं. पीडित मुलगी आरोपीच्या मुलीबरोबर खेळत होती. आरोपी हा मूळचा बिहारचा असून तो बांधकाम कामगार आहे. गोव्यात तो भाड्याच्या खोलीत राहतो. हे दोन्ही कुटुंबे जवळजवळ राहत असल्याने दोन्ही कुटुंबांचा संपर्क होता.
हेही वाचा >> लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून रिक्षात ठेवला मृतदेह, प्रियकर फरार
या दोन्ही कुटुंबातील मुले एकत्र खेळत असल्याने त्यांच्यात संवाद होत होता. परंतु, याच काळात २९ वर्षीय आरोपीने या पीडितेवर बलात्कार केला. याप्रकरणी आरोपीवर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POSCO) कायदा आणि गोवा चिल्ड्रन कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितसर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला गोवा पोलिसांनी अटक केली आहे.
बदलापुरात दोन अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण
बदलापूरच्या प्रतिथयश शाळेत १३ ऑगस्टला लैंगिक अत्याचाराची ( Badlapur Sexual Assault ) घटना घडली. अक्षय शिंदे या सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण केलं. त्यानंतर १७ तारखेला त्याला अटक करण्यात आली. २० ऑगस्टला बदलापूरमध्ये जनक्षोभ उसळला होता. यावेळी या प्रकरणातल्या आरोपीला फाशी देण्याचीही मागणी झाली. तसंच मध्य रेल्वेची वाहतूक आंदोलकांनी ९ तास रोखून धरली. दरम्यान या प्रकरणी जी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. या विशेष समितीने शाळेच्या दोन विश्वस्तांबाबत महत्त्वाची माहिती दिली. एसआयटीने हे प्रकरण चौकशीसाठी हाती घेतलं आहे. दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण ( Badlapur Sexual Assault ) झालं आणि त्यांच्यावर अत्याचार झाले हे प्रकरण तपासताना आता एसआयटीने सांगितलं आहे की शाळेचे दोन विश्वस्त फरार झाले आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस आणि सायबर पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत अशीही माहिती एसआयटीने दिली आहे. ANI या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.