Rape on Finance : जिच्याशी लग्न ठरलं होतं त्याच मुलीला बरोबर नेत तिच्यावर तिच्याच होणाऱ्या पतीने बलात्कार केला. त्याआधी तिच्या शरीरावर असंख्य चावे घेतले. बलात्कार करुनच हा नराधम थांबला नाही तर त्याने तिला मित्रांच्या हवाली केलं. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. २२ वर्षांच्या पीडितेच्या आईने पोलिसात तक्रार केल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली.

पोलिसांनी काय माहिती दिली?

Rape on Finance पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या मुलीशी लग्न ठरलं होतं तिला तिचा होणारा नवरा ऋषिकेश या ठिकाणी घेऊन गेला. तिथे नेल्यानंतर त्याने तिचं शोषण केलं, तिला जनावराप्रमाणे चावला आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने या मुलीला मित्रांच्या हवाले केलं. त्यांनीही तिचं शोषण केलं आणि तिला मारहाण केली. या घटनेनंतर पीडिता जेव्हा तिच्या घरी आली तेव्हा तिने तिच्या आईला घडला प्रकार सांगितला. ज्यानंतर आईने पोलिसात धाव घेतली.

RG Kar Rape-Murder Case
RG Kar Rape-Murder Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात मोठी अपडेट! पीडितेच्या वकिलाची खटल्यातून माघार; सांगितलं ‘हे’ कारण
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Anti corruption department filed case against Wangani Sarpanch Vanita Adhav for demanding bribe
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
Cyber ​​scam under the pretext of wedding invitation Nagpur news
विवाह निमंत्रणपत्रिकेच्या बहाण्याने सायबर घोटाळा; ‘एपीके फाइल’ने राज्यात अनेकांची फसवणूक झाल्याचे उघड

हे पण वाचा- नवी मुंबईत १६ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर उद्यानात बलात्कार

ही घटना कुठे घडली?

ही धक्कादायक घटना गाझियाबादमध्ये घडली आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवून चार जणांना या प्रकरणात अटक केली. पोलीस उपायुक्त राजेश कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलीस उपायुक्त राजेश कुमार म्हणाले, “आम्ही पीडितेची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. या पीडितेने न्यायालयात सांगितलं की तिचा होणारा नवरा तिला ऋषिकेशला घेऊन गेला. तिथे हॉटेल रुमवर नेऊन त्याने बलात्कार ( Rape on Finance ) केला. दुसऱ्या दिवशी सकाळी परतत असताना त्याने त्याच्या तीन मित्रांना बोलवून घेतलं होतं. ज्यांनी मला मारहाण केली.” या प्रकरणात पोलिसांनी कलम ३०९, कलम ११८ (१), कलम ७४ आणि कलम ८७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेच्या आईने नेमकं काय सांगितलं?

या प्रकरणात ( Rape on Finance ) पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितलं ही घटना २१ ऑगस्टची आहे. साधारण पाच वाजण्याच्या सुमारास तिचा होणारा नवरा तिला ऋषिकेशला घेऊन गेला. त्यावेळी त्याने तिचा फोन स्वतःजवळ घेतला होता. माझी मुलगी जेव्हा फोनबाबत विचारु लागली तेव्हा त्याने तिचा फोन फोडून टाकला. त्यानंतर तिला मारहाण केली, तिच्यावर बलात्कार केला. गाझियाबाद येथील पेट्रोल पंपाजवळ तिला सोडलं होतं असं पीडितेच्या आईने सांगितलं आहे. यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला.

Story img Loader