Agra Rape Case: कोलकाता, आसाम, बदलापूर अशा बलात्काराच्या घटनांमुळे भारतभरातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. शाळेतल्या चिमुकल्या मुलींवरही लैंगिक अत्याचार झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे. बलात्काऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. बदलापूरमध्ये तर आरपीला जमावासमोर आणून फाशी देण्याची मागणी करत लोकांनी तब्बल १० तास रेलरोको केला. पण एकीकडे एवढी आक्रमक मागणी होत असताना दुसरीकडे पोलिसांकडून बलात्काऱ्यांना पाठिशी घालण्याचेही धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या आग्रा परिसरातून समोर आला आहे.

उत्तर प्रदेशच्या आग्रा विद्यापीठाशी संलग्न इंजिनिअरिंग महाविद्यालयातील २० वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली. यानंतर पीडितेनं पोलिसांत तक्रारही दाखल केली. पण पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात सातत्याने चालढकल केली जात होती. अखेर पीडित तरुणीनं प्रचंड मनस्ताप झालेल्या अवस्थेत भररस्त्यात कपडे काढून आपला संताप व्यक्त केला. तेव्हा कुठे पोलीस प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली.

Supreme Court Contempt Notice To Maharashtra additional Chief Secretary
Supreme Court : “हे कसले IAS अधिकारी?” सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना सुनावलं, नोटीसह बजावली
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
Devendra Fadnavis on Narayan Rane Malvan Statue collapse
Malvan Shiv sena UBT vs BJP : मालवणच्या राड्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “नारायण राणे…”
president droupadi murmu
President Droupadi Murmu : “बस आता खूप झालं”, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची संतप्त प्रतिक्रिया; ‘या’ मुद्द्यावर केलं भाष्य!
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
Sexual abuse
Sexual Assault : किराणा दुकानदाराकडून लहान मुलांचं लैंगिक शोषण, अत्याचार करुन व्हिडीओ शूट करायचा आणि..

नेमकं घडलं काय?

२२ वर्षीय आरोपी हा जम्मू-काश्मीर आयआयटीचा विद्यार्थी असून तिथे एमटेकचं शिक्षण घेतो. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, पीडित युवतीनं स्थानिक पोलीस स्थानकात २९ जुलै रोजी आरोपीविरोधात शारिरीक व मानसिक छळ करत असल्याची तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी “तपासाअंती तक्रारकर्त्या युवतीच्या दाव्याला सबळ आधार देऊ शकेल, असे पुरावे मिळाले नाहीत”, असं म्हणून कोणतीही कारवाई करण्यास नकार दिला.

Rape in Jodhpur: जोधपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; दोन जण ताब्यात

मात्र, पोलिसांच्या याच निष्काळजीपणानंतर १० ऑगस्ट रोजी पीडित युवतीवर चालत्या कारमध्ये बलात्कार केल्याची तक्रार दाखल झाली. पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. पण त्यानंतर आरोपीला अटक करण्यात पोलिसांनी कोणताही रस दाखवला नाही. घटना घडली, तेव्हा आरोपी जम्मू-काश्मीरमध्ये होता, असं सांगून पोलिसांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही दिवस पीडित युवती सातत्याने पोलीस स्थानकात अटकेची मागणी करण्यासाठी जात राहिली. पण पोलिसांनी तिच्या मागणीकडे दुर्लक्षच केलं.

पीडितेच्या मनस्तापाचा भीषण उद्रेक

पोलिसांकडून सातत्याने निराशाच पदरी पडत असल्यामुळे मानसिक ताण व विमनस्क अवस्थेत पीडित युवतीनं रविवारी भररस्त्यात कपडे काढून आपला संताप व्यक्त केला. तेवढ्यात काही महिला तिच्या दिशेनं धावत आल्या आणि त्यांनी कपड्यांनी तिला झाकलं. आसपासच्या लोकांनी पोलिसांना बोलवल्यानंतर पीडितेची थेट मनोरुग्णालयात रवानगी करण्यात आली.

पीडित युवती तीन दिवस मनोरुग्णालयातच राहिली. शेवटी तिच्या वागणुकीत काहीही चुकीचं आढळलं नसल्याचा निर्वाळा देऊन रुग्णालयानं युवतीला तिच्या घरच्यांकडे सोपवलं. इकडे युवतीच्या संतापामुळे पोलीस यंत्रणा हलली आणि त्यांनी आरोपी तरुणाला चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलावलं.

“आम्ही आरोपीला चौकशीसाठी आग्र्याला बोलावलं. त्यानंतर त्याला अटक केली. नंतर आमच्या लक्षात आलं की आरोपी गेल्या काही महिन्यांपासून पीडित युवतीचा मानसिक व शारिरीक छळ करत आहे”, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.