महाराष्ट्र कॅडरच्या आयपीएस अधिकाऱ्यावर मध्यप्रदेशात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यूपीएससी उत्तीर्ण होण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका मुलीवर विवाहाच्या आमिषाने बलात्कार करण्यात आला असे पोलिसांनी सांगितले. जबलपूर येथील पीडित महिलेने २०१३ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी लोहित मटानी याच्याविरोधात फिर्याद दिली असून त्यात म्हटल्यानुसार तुकोगंज भागात यावर्षी त्याने तिला विवाहाच्या आमिषाने बोलावले होते असे पोलीस अधीक्षक ओ.पी.त्रिपाठी यांनी सांगितले. पीडितेने केलेल्या आरोपानुसार तो तिची ओळख पत्नी किंवा प्रेयसी अशी करून देत असे पण नंतर त्याने विवाहाचे आश्वासन पाळले नाही. सदर पीडिता फेसबुकच्या माध्यमातून मटानी याच्या संपर्कात आली होती व त्याने तिला यूपीएससी परीक्षेच्या तयारीत मदत करण्याचे आश्वासनही दिले होते. या प्रकरणी जबलपूर येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा