Rapido : आजकाल वाहतुकीचे विविध खासगी सेवा देणारे पर्याय उपलब्ध आहेत. टॅक्सी किंवा रिक्षा मिळाली नाही तर अनेकदा लोक उबर, ओला, रॅपिडो, ब्ला ब्ला टॅक्सी अशा खासगी सेवांचा उपयोग करत असतात. मात्र एका महिलेला रॅपिडो चालकाने कसं छळलं याबाबतचा तिचा अनुभव सांगितला आहे. दिल्लीत ही घटना घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रॅपिडो चालकाबाबत महिलेने काय सांगितलं?

रॅपिडो चालकाबाबत आपला अनुभव सांगत महिलेने सांगितलं की रॅपिडो चालकाने तिला मेसेज करुन फोन करुन त्रास दिला. मला त्याने प्रवासादरम्यान काहीही त्रास दिला नाही. त्याने ज्या ठिकाणी जायचं होतं तिथे मला सोडलं. त्यानंतर मात्र तो मला व्हॉट्स अॅपवर कॉल आणि मेसेज करुन त्रास देऊ लागला. Reddit वर पोस्ट करत या महिलेने तिला आलेला सगळा अनुभव सांगितला आहे.

चालकाने इच्छित स्थळी सोडलं पण नंतर मला त्रास देऊ लागला

या महिलेने सांगितलं मी रॅपिडो राइड बुक केली. त्यानंतर त्या चालकाने मला इच्छित स्थळी सोडलं. पैसे देत असताना काही खासगी प्रश्न विचारण्यास त्याने सुरुवात केली. राईड सुरु केली तेव्हा मी त्याच्याशी थोडंसं बोलणं केलं होतं. मात्र नंतर संवादाचा विसंवाद झाला. चालकाने अचानक मला विचारलं तुमचं लग्न झालं आहे का? एवढंच नाही तर मला भय्या म्हणू नकोस तू फारच सुंदर आहेस असं तो मला म्हणू लागला. तसंच मला म्हणाला की तुझं इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंट काय आहे ते सांग. मी सोशल मीडियावर तुला फॉलो करेन. मी त्याला सांगितलं मी सोशल मीडिया वापरत नाही आणि त्यानंतर मी अक्षरशः पळून आले. असं या महिलेने लिहिलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

चालकाने डझनभर कॉल आणि अनेक मेसेज केले

मात्र हा सगळा अनुभव इथेच संपला नाही. त्याच दिवशी मला त्या चालकाने अनेकदा कॉल केले आणि मेसेजही केले. व्हॉट्स अॅप नंबरवरही त्याने मेसेज पाठवले. रेडइट वर या महिलेने तिचा अनुभव सांगताच अनेकांनी तिला विविध प्रकारे सल्ले दिले. एक युजर म्हणाला तू सुरक्षित आहेस ही बाब महत्त्वाची आहे. तसंच त्या चालकाच्या विरोधात कारवाई करायला विसरु नकोस. एकाने सांगितलं तुझ्या जवळच्या व्यक्तींना त्या चालकाच्या छळाबाबत सांग त्याचं लाइव्ह लोकेशन काय होतं ते पोलिसांना कळव. शिवाय रॅपिडो सारखी बाईक टॅक्सी सेवा यापुढे वापरु नकोस. शक्यतो यापुढे ऑटो किंवा टॅक्सी बुक कर.

रॅपिडोने दिलं कारवाईचं आश्वासन

दरम्यान महिलेने रॅपिडोकडे याबाबत तक्रार केली आहे. रॅपिडोने या महिलेला मेसेज करुन आम्ही जो ड्रायव्हर तुला त्रास देत होता त्याच्यावर कठोर कारवाई करु असं आश्वासन दिलं आहे. आमच्यासाठी तुझी सुरक्षा, तुझं समाधान महत्त्वाचं आहे. अशा प्रकारच्या घटना यापुढे घडू नयेत यासाठीही आम्ही तत्पर आहोत असंही रॅपिडोने या महिलेला मेसेज करुन सांगितलं आहे.