गेल्या दोन दिवसांपासून डीपफेक व्हिडीओ व फोटोंची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. याला कारण ठरला तो ‘पुष्पा’फेम अभिनेत्री रश्मिका मंदानाचा व्हायरल होणारा एक डीपफेक व्हिडीओ. त्यावर बॉलिवुडमधील अनेक दिग्गजांनी संताप व्यक्त केल्यानंतर आता कतरिना कैफचाही एक डीपफेक फोटो व्हायरल होत आहे. ‘टायगर ३’ मधील एक सीन मॉर्फ्ड करून तो फोटो व्हायरल केला जात आहे. या प्रकारांमुळे संबंधित कलाकार, सेलिब्रिटींची बदनामी होत असल्याची बाब चर्चेत असताना आता केंद्र सरकारने यासंदर्भात मोठं पाऊल उचललं आहे. हा सगळा कंटेंट येत्या २४ तासांत आपापल्या प्लॅटफॉर्म्सवरून काढून टाका, असे निर्देश केंद्रानं या सर्व संकेतस्थळांना दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रश्मिका, कतरिनाचे डीपफेक

दोन दिवसांपासून सोशल मीडियावर रश्मिका मंदानाचा एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका लिफ्टमध्ये रश्मिका मंदाना शिरताना या व्हिडीओत दिसत आहे. पण व्हिडीओतली व्यक्ती रश्मिका नसून मॉडेल झारा पटेलचा असल्याची बाब नंतर समोर आली. त्यापाठोपाठ आज दिवसभर टायगर ३ मधील एका सीनचा कतरिना कैफचा एक फोटोही अशाच प्रकारे डीपफेक तंत्रज्ञानाच्या आधारे मॉर्फ्ड करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने या वेबसाईट्सला हा कंटेंट काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहेत केंद्र सरकारचे आदेश?

इंडियन एक्स्प्रेसनं सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे. यानुसार केंद्र सरकारने संबंधित संकेतस्थळांना सरकारच्या नियमावलीनुसार पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ डीचा दाखला देत अशा प्रकारे एखाद्याचे फोटो, व्हिडीओ मॉर्फ्ड करून फसवणूक करण्यासाठीची शिक्षा व त्यासंदर्भातील तरतुदींचाही या निर्देशांमध्ये उल्लेख करण्यात आला आङे. त्यानुसार, असा गुन्हा करणाऱ्यास तीन वर्षांचा तुरुंगवास व १ लाखांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

रश्मिकानंतर कतरिना कैफचा डीपफेक फोटो व्हायरल, ‘टायगर ३’ मधील टॉवेल सीन केला मॉर्फ

त्याशिवाय, याच कायद्याच्या कलम ३(२)(ब)नुसार अशा प्रकारे फोटो किंवा व्हिडीओ मॉर्फ्ड करण्यात आल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर २४ तासांत तो व्हिडीओ किंवा फोटो आपल्या संकेतस्थळावरून काढणं बंधनकारक आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashmika mandanna deepfake viral video katrina kaif photo central government advisory to social media remove it pmw