Rashtrapati Bhavan React on Sonia Gandhi Criticize : “राष्ट्रपती यांची भाषण करता करता चांगलीच दमछाक झाली. त्या कशाबशा बोलत होत्या”, अशी टीका सोनिया गांधी यांनी आजच्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर केली. त्यांच्या या टीकेवर आता प्रत्युत्तर यायला लागले असून राष्ट्रपती कार्यालयातूनही यावर उत्तर देण्यात आलं आहे. सोनिया गांधींचं विधान अस्वीकार्य आहे, असं कार्यालयातून सांगण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“संसदेतील माननीय राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना काँग्रेस पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांनी उच्चपदस्थांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी टिप्पणी केली आहे आणि म्हणूनच ती अस्वीकार्य आहे. या नेत्यांनी म्हटले आहे की राष्ट्रपती शेवटपर्यंत खूप थकल्या होत्या आणि त्या बोलू शकत नव्हत्या”, असं राष्ट्रपती भवनातील प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

काँग्रेस नेत्यांना हिंदी भाषा समजली नसावी

“राष्ट्रपती भवन स्पष्ट करू इच्छिते की राष्ट्रपती कोणत्याही टप्प्यावर थकल्या नव्हत्या. खरंच, त्यांचा असा विश्वास आहे की उपेक्षित समुदायांसाठी, महिला आणि शेतकऱ्यांसाठी बोलणे थकवणारे असू शकत नाही. राष्ट्रपती कार्यालयाचा असा विश्वास आहे की कदाचित या नेत्यांनी हिंदीसारख्या भारतीय भाषांमधील वाक्प्रचार आणि भाषण समजले नसेल आणि त्यामुळे त्यांचा गैरसमज निर्माण झाला असेल. कोणत्याही परिस्थितीत अशा टिप्पण्या वाईट, दुर्दैवी आणि पूर्णपणे टाळता येण्यासारख्या आहेत”, असंही राष्ट्रपती भवनातून स्पष्ट करण्यात आलं.

सोनिया गांधी नेमकं काय म्हणाल्या होत्या?

सोनिया गांधी म्हणाल्या, ‘राष्ट्रपती यांची भाषण करता करता चांगलीच दमछाक झाली. त्या कशाबशा बोलत होत्या. फारच वाईट’. सोनियांच्या या निरीक्षणाला राहुल गांधी होकार दिला. राष्ट्रपती यांनी भाषणात तेच तेच मुद्दे सांगितले असं राहुल गांधी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtrapati bhavan reaction on sonia gandhi criticize over her poor thing budget session 2025 sgk