रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. मॉस्कोच्या स्थानिक वेळेनुसार, रविवारी रात्री नऊच्या सुमारास व्लादिमीर पुतिन हे त्यांच्या बेडरुममध्ये खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. जमिनीवर कोसळण्यापूर्वी पुतिन यांनी जेवणाच्या टेबलवरील काही वस्तू फरशीवर पाडल्या, या आवाजामुळेच सुरक्षा रक्षकांनी बेडरुमकडे धाव घेतल्याचं बोललं जात आहे, याबाबतचं वृत्त टेलिग्रामवरील एका चॅनेलने दिलं आहे.

पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त समोर येताच सर्वत्र खळबळ उडाली आहे. पुतिन यांच्यावर सध्या विशेष अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत, अशी माहिती टेलिग्राम चॅनेल ‘जनरल एसव्हीआर’ने दिली आहे. हे चॅनेल रशियाचे माजी लेफ्टनंट जनरल यांच्याद्वारे चालवलं जातं. ते नियमितपणे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या आरोग्यावर भाष्य करतात. यापूर्वी पुतीन गंभीर आजारी असल्याचं वृत्तही या चॅनेलने दिलं होतं.

donald trump s desire to acquire greenland
अन्वयार्थ : ट्रम्प यांचा ग्रीनलँडहट्ट
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Winter: Tips to Maintain Respiratory Health
हिवाळ्यात श्वास घेण्यास त्रास होतोय? श्वसनाशी संबंधित आरोग्य कसे जपावे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
रशिया-युक्रेन युद्धात ३२ वर्षीय भारतीय तरुणाचा मृत्यू झाला, तो केरळ येथील रहिवासी होता. (फोटो सौजन्य @YashBarapatre6)
बिनिल टी.बी कोण होता? तो रशियन सैन्यात कसा भरती झाला होता?
Binil and Jain were among the several Indian youths who had travelled to Russia
रशिया-युक्रेन युद्धात भारतीय तरुणाचा मृत्यू, एक गंभीर; अनेक महिन्यांपासून मायदेशी पाठवण्याची विनवणी केली, पण…
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
Navri Mile Hitlarla
“दोघांचं भांडण…”, अनोळखी मन्याच्या ‘त्या’ कृतीमुळे लीला-एजेमध्ये येणार दुरावा? नेटकरी म्हणाले, “ट्विस्ट छान आहेत; पण…”
Donald Trump
Donald Trump : ‘हश मनी’ प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा! सर्व आरोपातून झाली बिनशर्त सुटका

हेही वाचा- Israel-Hamas War : इस्रायल-हमास युद्धात रशिया कोणाच्या बाजूने? पुतिन यांच्याकडून भूमिका स्पष्ट, ‘या’ देशावर गंभीर आरोप

संबंधित टेलिग्राम चॅनेलने दावा केला की, पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यावेळी सेवेवर असणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना तातडीने शुद्धीवर आणलं. त्यांना वेळेवर वैद्यकीय मदत पुरवली. मॉस्कोच्या स्थानिक वेळेनुसार रविवारी रात्री ९ च्या सुमारास राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षा रक्षकांनी पुतिन यांच्या बेडरुममधून वस्तू पडल्याचा आवाज ऐकला. यानंतर दोन सुरक्षा अधिकाऱ्यांनी तत्काळ पुतिन यांच्या बेडरूमकडे धाव घेतली. यावेळी पुतीन हे बेडच्या शेजारी फरशीवर पडलेल्या अवस्थेत आढळले. तसेच बाजूला खाण्या-पिण्याचे टेबल उलटवल्याचंही आढळून आलं.

हेही वाचा- पुतीन यांच्याजवळ नेहमी एक बॅग का असते? जगाचा विध्वंस करण्याची क्षमता असलेल्या ‘न्यूक्लियर ब्रिफकेस’मध्ये काय आहे? जाणून घ्या…

कदाचित, व्लादिमीर पुतिन यांनी जमिनीवर कोसळताना धक्क्याने टेबलवरील भांडी खाली पडली. ज्यामुळे बेडरूममध्ये आवाज झाला आणि सुरक्षारक्षक धावत आले. यानंतर निवासस्थानी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तातडीने शेजारील एका खोलीत पुतिन यांच्यावर उपचार केले. सध्या त्यांच्यावर विशेष अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचं बोललं जात आहे.

Story img Loader