Industrialist Ratan Tata Died at 86 : भारताचे प्रसिद्ध उद्योजक आणि टाटा या नावाजलेल्या कंपनीचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं निधन झालं आहे. त्यामुळे संपूर्ण देश हळहळला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर मुंबईतल्या ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र अखेर वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांनी देशासाठी दिलेलं योगदान हे खूप मोठं आहे. तसंच रतन टाटा यांच्याविषयी संपूर्ण देशाला वेगळीच आपुलकी होती यात काहीही शंका नाही. देशभक्ती आणि देशहिताचे आदर्श, उद्योग जगतातले पितामह अशी रतन टाटांची ( Ratan Tata ) ओळख होती.

टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून दीर्घकाळ काम

रतन टाटा ( Ratan Tata ) देशातील जवळपास प्रत्येकाच्या आवडत्या उद्योजकांपैकी एक होते. सर्वात मोठा व्यवसाय समूह असलेल्या टाटा या समूहाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. टाटा समूहाची स्थापना जमशेदजी टाटा यांनी केली होती. त्यांच्या कुटुंबातील अनेक पिढ्यांनी या समूहाचा विस्तार केला. जगातील सर्वात लहान कार नॅनो तयार केल्याने रतन टाटा जगभरात प्रसिद्ध झाले.

International Mens Day
पुरुषाचं घर, घरचा पुरुष
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
deceased Raghunandan Jitendra Paswan
बिहारी तरुणाची मुंबईत हत्या; आंतरधर्मीय संबंधांतून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”
Pune Prime Minister Narendra Modi Pandit Jawaharlal Nehru Pune print news
पुणे आवडे पंतप्रधानांना!

रतन टाटांची कारकीर्द कशी होती आपण जाणून घेऊन

रतन टाटा ( Ratan Tata ) १९६१ च्या दरम्यान टाटा स्टील कंपनीत सामान्य कर्मचारी म्हणून रुजू झाले

१९९१ मध्ये रतन टाटा ( Ratan Tata ) यांची टाटा ग्रुपच्या चेअरमनपदी, जेआरडी टाटांनी पद सोपवलं

रतन टाटांकडे टाटा समूहाचं चेअरमनपद आल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांनी स्वतःची हिस्सेदारी वाढवली

१९९८ मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची ‘इंडिका’ कार टाटा मोटर्सने बनवली अशा पद्धतीची कार तयार करणं हे रतन टाटांचं स्वप्न होतं

यानंतर एका कुटुंबाला मोटारसायकलवर प्रवास करताना पाहून स्वस्तात कार बनवण्याची कल्पना सुचली

२००८ मध्ये रतन टाटांच्या मार्गदर्शनात टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली, त्यामुळेच रतन टाटांनान नॅनो कारचे जनक असंही म्हटलं जातं.

२०१२ मध्ये रतन टाटांनी टाटा सामूहाच्या चेयरमनपदाचा राजीनामा, सायरस मेस्त्रीकडे पदभार दिला

मात्र सायरस मेस्त्रींबरोबर वाद झाल्याने २०१६ मध्ये रतन टाटा पुन्हा एकदा टाटा समूहाच्या चेअरमनपदी आले

नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहाचे चेअरमन

रतन टाटांच्या पश्चात धाकटे भाऊ जिम्मी टाटा, नोएल टाटा हे दोन भाऊ आहेत

रतन टाटांचे ( Ratan Tata ) बंधू नोएल टाटा यांना लेह टाटा, माया टाटा, नेव्हिल टाटा ही तीन मुले आहेत.

हे पण वाचा- Ratan Tata Death : “देशाने दूरदर्शी आणि दयाळू मार्गदर्शक गमावला”, रतन टाटांच्या निधनानंतर नितीन गडकरींची पोस्ट

रतन टाटा यांना विविध पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे

रतन टाटा ( Ratan Tata ) यांची सुरुवातीची कारकीर्द १९६२ मध्ये टाटा समूहात सुरू झाली, जिथे त्यांनी अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी कॉर्पोरेटमध्ये काम केले होते. त्यांनी टाटा समूहाचा व्यवसाय इतर देशांमध्ये विस्तारला आहे. रतन टाटा यांना २००८ मध्ये पद्मविभूषण आणि २००० मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता तो आपल्या धर्मादाय कार्यात व्यस्त आहे. नोव्हेंबर २००७ मध्ये, फॉर्च्युन मासिकाने त्यांचा व्यवसायातील २५ सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश केला.

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा आणि आईचे नाव सनी टाटा आहे. त्यांच्या आजोबांचे नाव जमशेद टाटा होते. रतन टाटा यांना सिमोन टाटा नावाची सावत्र आई देखील आहे. सिमोनला नोएल टाटा नावाचा मुलगा आहे. नवल आणि सोनू टाटा यांनी रतन टाटा यांना दत्तक घेतले जेव्हा ते फक्त १० वर्षांचे असताना त्यांच्या पालकांपासून वेगळे झाले.

रतन टाटा यांची कौटुंबिक पार्श्वभूमी

रतन टाटा १० वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील वेगळे झाले. त्यानंतर त्यांना त्यांची आजी नवाझबाई टाटा यांनी जीन पेटिट पारसी अनाथाश्रमातून औपचारिकपणे दत्तक घेतले. रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्यासह ते वाढले. रतन टाटा यांनी सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील कॅम्पियन स्कूलमधून घेतल होतं. या शाळेत ते आठवीपर्यंत शिकले.त्यानंतर रतन टाटा कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये गेले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी १९६२ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून स्ट्रक्चरल अभियांत्रिकीसह आर्किटेक्चरमध्ये बीएस पूर्ण केले. हे शिक्षण पूर्ण करून त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश घेतला. जिथे रतन टाटा यांनी १९७५ मध्ये प्रगत व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण केला. रतन टाटा यांनी कॅम्पियन स्कूल, मुंबई, कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, बिशप कॉटन स्कूल, शिमला आणि न्यूयॉर्क शहरातील रिव्हरडेल कंट्री स्कूलमध्ये शिक्षण घेतले. ते कॉर्नेल विद्यापीठ आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलचे माजी विद्यार्थी होते.

चारवेळा लग्नाचा विचार केला पण

रतन टाटा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की मी चारवेळी लग्नाचा विचार केला, त्या निर्णयापर्यंत आलो होतो पण प्रत्येक वेळी मी भीतीमुळे किंवा इतर कारणांमुळे मागे हटलो. एकदा लॉस एंजेलिसमध्ये काम करत असताना टाटा एका मुलीच्या प्रेमात पडले आणि त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याच्या आजारपणामुळे त्यांना भारतात परतावे लागले. मुलीच्या पालकांनी तिला भारतात जाऊ दिले नाही. त्यानंतर रतन टाटांनी लग्न करण्याचा विचार सोडला. ते आजन्म अविवाहित राहिले. आज रतन टाटा यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.