Ratan Tata Family Tree : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर रोजी रात्री उशीरा मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाविन्यपूर्ण नेतृत्त्वामुळे त्यांनी टाटा समूहाचा कायापालट केला. याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही झाला. रतन टाटा हे प्रतिष्ठित उद्योगपतींपैकी एक होते. टाटा समूहाला जागतिक स्तरावर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

२८ डिसेंबर १९३७ रोजी जन्मलेले रतन टाटा हे भारतातील सर्वात प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबांपैकी एक होते. १९ व्या शतकापासून त्यांचा हा पारंपरिक व्यवसाय आहे. याची सुरुवात टाटा घराण्याचे संस्थापक नुसेरवानजी टाटा यांच्यापासून होते. त्यांनीच टाटा घराण्याचा पाया घातला होता.

Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल
Loksatta vyaktivedh Dairy personality Ravindra Pandurang Apte former president of Gokul passed away
व्यक्तिवेध: रवींद्र आपटे
Shiv Nadar is the most philanthropic industrialist in the country print eco news
शिव नाडर देशातील सर्वांत दानशूर उद्योगपती; आर्थिक वर्षात २,१५३ कोटी रुपयांचे दातृत्व
Leader of Opposition in Lok Sabha and Congress leader Rahul Gandhi.
Rahul Gandhi : राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात विदर्भापासून का केली?
Ashok MaMa Colors Marathi New Serial
मुहूर्त ठरला! ‘अशोक मा.मा.’ मालिकेत झळकणार प्रसिद्ध अभिनेत्याची लेक अन् ‘कलर्स मराठी’ची लोकप्रिय नायिका, पाहा प्रोमो
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : “महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर महिलांना प्रति महिना ३ हजार रुपये आणि बस प्रवास मोफत”, राहुल गांधींची गॅरंटी

नुसेरवानजी टाटा

नुसेरवानजी टाटा (१८२२-१८८६) हे टाटा कुटुंबाचे कुलगुरू होते. त्यांचे लग्न जीवनबाई कावसजी टाटा यांच्याशी झाले होते आणि त्यांना पाच मुले होती. जमशेदजी टाटा, रतनबाई टाटा, मानेकबाई टाटा, वीरबाईजी टाटा आणि जेरबाई टाटा. नुसेरवानजी यांचे पुत्र जमशेदजी टाटा यांनी टाटा समूहाची स्थापना केली. जो भारतातील सर्वात मोठा आणि प्रभावशाली समूह बनला आहे.

हेही वाचा >> Who is N Chandrasekaran : रतन टाटा यांचा सर्वांत विश्वासू माणूस एन. चंद्रशेखरन कोण? शेतकरी कुटुंबात जन्म अन् ठरले सर्वांत जास्त पगार घेणारे व्यावसायिक अधिकारी

जमशेदजी टाटा

जमशेदजी टाटा (१८३९-१९०४) हे टाटा समूहाचे संस्थापक आहेत. त्यांना “भारतीय उद्योगाचे जनक” म्हणून संबोधले जाते. १८७० च्या दशकात मध्य भारतातील एका कापड गिरणीतून त्यांनी आपला उद्योजकीय प्रवास सुरू केला. भारताच्या पोलाद आणि उर्जा उद्योगांना आकार देण्यात, तांत्रिक शिक्षण संस्था स्थापन करण्यात आणि भारताच्या औद्योगिक प्रगतीमध्ये त्यांच्या दूरदृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावली. जमशेटजींचा विवाह हिराबाई दाबू यांच्याशी झाला होता आणि त्यांना तीन मुले होती. सर दोराबजी टाटा, धुनबाई टाटा आणि सर रतन टाटा.

सर दोराबजी टाटा

सर दोराबजी टाटा (१८५९-१९३२) हे जमशेदजींचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांनी टाटा समूहाच्या वाढीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दोराबजींना मूलबाळ नव्हते आणि त्यांनी कुटुंबाचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांचे बरेच आयुष्य समर्पित केले.

सर रतन टाटा

सर रतन टाटा (१८७१-१९१८) , जमशेटजींचा धाकटा मुलगा, हे देखील कौटुंबिक व्यवसाय आणि परोपकारात मोठ्या प्रमाणावर गुंतले होते. त्यांचे लग्न नवजबाई सेट यांच्याशी झाले होते, पण त्यांना मूलबाळ नव्हते. सर रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर नवाजबाईंनी नवल टाटा यांना दत्तक घेतले, जे पुढे कुटुंबाच्या वारशातील प्रमुख व्यक्तिमत्व बनले.

नवल एच. टाटा

नवल एच. टाटा (१९०४ – १९८९) हे सर रतन टाटा आणि नवजबाई सेट यांचे दत्तक पुत्र होते. नवल टाटा यांनी सूनू कमिसरिअटशी लग्न केले. त्यांना रतन टाटा आणि जिमी टाटा ही दोन मुले झाली. रतन टाटा अवघ्या १० वर्षांचे असताना नवल आणि सूनू यांचा घटस्फोट झाला. नवल यांनी नंतर सिमोन डुनॉयरशी लग्न केले आणि त्यांना नोएल टाटा नावाचा मुलगा झाला.

रतन टाटा त्यांचा भाऊ जिमी टाटा आणि त्यांचा सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्यासोबत मोठे झाले. त्याच्या पालकांच्या घटस्फोटानंतर रतन आणि जिमी यांचे संगोपन त्यांच्या आजी, नवजबाई सेट यांनी मुंबईतील कौटुंबिक मालमत्ता असलेल्या टाटा पॅलेसमध्ये केले.

रतन टाटा (१९३७-२०२४) यांनी टाटा समूहासाठी आपले बरेचसे आयुष्य समर्पित केले. १९९१ पासून २०१२ मध्ये निवृत्तीपर्यंत त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केले. जग्वार लँड रोव्हर सारख्या मोठ्या अधिग्रहणांसह, जागतिक स्तरावर कंपनीचा विस्तार करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून भारतभर विविध सामाजिक आणि धर्मादाय प्रकल्पांवर काम केले. तर, रतन टाटा यांचा धाकटा भाऊ जिमी टाटा हे प्रसिद्धीपासून जरा लांबच राहिले. ते कौटुंबिक व्यवसायातही सक्रिय झाले नाहीत.
तर, रतन आणि जिमी यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा हे सध्या टाटा समूहातील महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत. ते टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. अनेकजण नोएल टाटा यांना टाटा समूहातील भावी नेतृत्वासाठी प्रबळ दावेदार मानतात.