भारताचे ‘वॉरन बफे’ अशी ओळख असलेले आणि भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि शेअर बाजाराचे ‘किंग’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांना मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर विविध स्थरातून प्रतिक्रिया येत आहे. उद्योगपती रतन टाटा यांनीही राकेश झुनझुनवाला यांना श्रंद्धाजली वाहिली आहे. ”राकेश झुनझुनवाला हे त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे नेहमीच लक्षात राहतील.”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – राज्याच्या तिजोरीच्या चाव्या देवेंद्र फडणवीसांकडे, गृहमंत्रीपदही सांभाळणार

काय म्हणाले रतन टाटा?

”राकेश झुनझुनवाला यांचे आज सकाळी दुखद निधन झाले. त्यांना शेयर मार्केट जी समज होती, त्यासाठी देश त्यांना नेहमीच लक्षात ठेवेन. तसेच त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळेही ते कायम लक्षात राहतील. दु:खाच्या या प्रसंगी आम्ही त्यांच्या परिवाराबरोबर आहोत”, अशी प्रतिक्रिया उद्योगपती रतन टाटा यांनी दिली आहे.मोठी बातमी! एकनाथ शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? वाचा संपूर्ण यादी!

हेही वाचा – मोठी बातमी! एकनाथ शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? वाचा संपूर्ण यादी!

एका झटक्यात कमावले होते ६०० कोटी

राकेश झुनझनवाला यांनी काही तासांतच टाटा समूहाच्या कंपनीकडून ६०० कोटी रुपयांची कमाई केली होती. रतन टाटांच्या टायटन कंपनीत राकेश झुनझुनवाला यांची मोठी भागीदारी होती. टायटन शेअरच्या किमतीत ६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. त्यामुळे झुनझुनवाला यांना मोठा नफा झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratan tata reaction after rakesh jhunjhunwala passes away spb