Ratan Tata Shantanu Naidu Old Video Viral: भारतातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे ८६ व्या वर्षी निधन झाले. देशभरातील लोक आज रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांच्या निधनानंतर त्यांचे अनेक जुने व्हिडीओ लोक सोशल मीडियावर शेअर करत आहेत. असाच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीच्या त्यांच्या वाढदिवसाचा आहे.

रतन टाटा यांचा असिस्टंट व मित्र शांतनू नायडूने त्यांचा ८४ वा वाढदिवस खूप साधेपणाने साजरा केला होता. तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. रतन टाटा यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढण्याचा आयुष्यभर प्रयत्न करेन, असं शांतनूने म्हटलंय. ३० वर्षांचा शांतनू व रतन टाटा खूप जवळचे मित्र होते. दोन वर्षांपूर्वी त्यानेच रतन टाटा यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं होतं.

हेही वाचा – मुक्या प्राण्याची माया! रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा पाळीव श्वान उपाशी, अंत्यदर्शनाचा भावुक करणारा Video

इन्स्टंट बॉलीवूडने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की रतन टाटा यांच्यासमोर टेबलावर एक कपकेक ठेवला आहे आणि त्यात दोन मेणबत्त्या लावल्या आहेत. रतन टाटा नंतर त्या मेणबत्त्या विझवतात आणि शांतनू त्यांना हाताने कपकेक भरवतो.

हेही वाचा – कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची रतन टाटांशी भेट अन् मैत्री कशी झाली? वाचा

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भावुक कमेंट्स केल्या आहेत. ‘भारताने हिरा गमावला,’ ‘तुम्ही अशी व्यक्ती होतात, ज्यांच्या निधनाने सर्वांनाच दुःख झालंय, हीच चांगल्या लोकांची ओळख असते,’ ‘हा व्हिडीओ पाहून मला रडायला येतंय,’ ‘खरे जेंटलमन,’ ‘दिग्गज कधीच मरत नाहीत,’ ‘भारताने खरा हिरा गमावला, एका युगाचा अंत झाला’, अशा भावनिक कमेंट्स युजर्स या व्हिडीओवर करत आहेत.

Ratan Tata Shantanu Naidu Old Video comments
रतन टाटा-शांतनूच्या व्हिडीओवरील कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट)

रतन टाटा यांचे बुधवारी रात्री ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. प्रकृती खालावल्याने त्यांना सोमवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते आयसीयूमध्ये होते. बुधवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले.