BJP Attacks Rahul Gandhi: भारतीय जनता पार्टीचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले असून, त्यांनी “भारतीय लोकशाही कमकुवत करण्याचा कट रचला आहे”, असे म्हटले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यांचा हवाला देत रविशंकर प्रसाद म्हणाले की, भारतातील मतदारांच्या टक्केवारीवर परिणाम करण्यासाठी २१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे वाटप करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशासाठी लज्जास्पद

“डोनाल्ड ट्रम्प यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे की, भारतातील मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम करण्यासाठी २१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स दिले जात होते. आम्ही हा मुद्दा यापूर्वीही उपस्थित केला होता. ते भारतीय लोकशाही कमकुवत करण्याचे कट रचत होते. काँग्रेसने जे केले आहे ते देशासाठी लज्जास्पद आहे,” असे माजी केंद्रीय मंत्री प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले.

दरम्यान भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांनी हा मुद्दा राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्यांदरम्यान केलेल्या विधानांशी जोडला आणि म्हटले की, “राहुल गांधी परदेशात असताना म्हणायचे की, मोठ्या लोकशाही राष्ट्रांना भारतात लोकशाही धोक्यात असल्याची चिंता का नाही.”

त्यांच्याकडे खूप पैसा आहे

फ्लोरिडातील मियामी येथे झालेल्या एफआयआय प्रायोरिटी समिटला संबोधित करताना ट्रम्प यांनी भारतातील लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अमेरिकेने दिलेल्या २१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या वाटपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

यावर बोलतना डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे म्हटले होते की,, “मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी भारतात २१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च करण्याची गरज का आहे? मला वाटते की, ते दुसऱ्या कोणालातरी निवडून आणण्याचा प्रयत्न करत होते. आपल्याला भारत सरकारला हे सांगावे लागेल.”

ट्रम्प यांनी भारताच्या मजबूत आर्थिक स्थितीकडे आणि अमेरिकन वस्तूंवरील उच्च करांकडे लक्ष वेधले आणि म्हटले की, “त्यांच्याकडे खूप पैसा आहे. आपल्या बाबतीत ते जगातील सर्वात जास्त कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहेत.”

ट्रम्प यांनी परदेशात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च करण्याची आवश्यकता का आहे? असा प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “मला भारताबद्दल खूप आदर आहे. मला पंतप्रधानांबद्दल खूप आदर आहे. ते दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेला भेट देऊन गेले आहेत, तुम्हाला माहिती आहेच. पण आपण भारतात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी २१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स का देत आहोत.”