Premium

क्रिकेटपटूंच्या मतदानासाठी अश्विनची बॅटिंग, मोदींना केली विनंती

यंदाची IPL स्पर्धा आणि लोकसभा निवडणूकीचे बिगुल एकाचवेळी वाजले आहे

क्रिकेटपटूंच्या मतदानासाठी अश्विनची बॅटिंग, मोदींना केली विनंती

यंदाची IPL स्पर्धा आणि लोकसभा निवडणूकीचे बिगुल एकाचवेळी वाजले आहे. प्रत्येकला मतदानाचा आधिकार आहे. आयपीएल स्पर्धेमुळे भारतीय खेळाडू देशांतील विविध ठिकणी क्रिकेट खेळण्यासाठी प्रवास करत असतात. मतदानाच्या दिवशी खेळाडू आपल्या मतदार संघाबाहेर असतील त्यामुळे खेळाडू ज्या राज्यात असतील त्याच राज्यात त्यांना मतदान करण्याची संधी द्यावी अशी विनंती भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने केली आहे. अश्विनने ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबतची विनंती केली आहे.

११ एप्रिल ते १९ मे दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्यामध्ये मतदान होणार आहे. यावेळीच आयपीएल स्पर्धा सुरू आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या मतदानासाठी एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून अश्विनने बॅटींग केली आहे.

रविद्रंदन अश्विन IPL मधील किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट करुन IPL स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंची समस्या मांडली आहे. भारतीय राज्यघटनेने आपल्या नागरिकांना दिलेली सर्वात मोठी ताकद म्हणजे मतदानाचा अधिकार होय. त्यामूळे प्रत्येक मतदाराने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय आपली लोकशाही अधिक सक्षम होणार नाही. परंतू IPL चे सामने मतदानादरम्यान आले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ravichandran ashwin tweets request to pm modi in ipl season

First published on: 27-03-2019 at 17:16 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या