उत्तराखंडमधील हरिश रावत यांचे सरकार म्हणजे एकखांबी तंबू असल्याचे मत व्यक्त करून भाजपने मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्याची मागणी केली आहे. मंत्र्यांचे खातेवाटप अद्यापही करण्यात आलेले नसल्याने त्याचा विपरीत परिणाम विकासकामांवर होत आहे, असेही भाजपने म्हटले आहे.
उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ रावत यांनी जवळपास एक महिन्यापूर्वी घेतली, तरीही मंत्र्यांना अद्यापही खातेवाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे मंत्र्यांकडे तक्रार घेऊन गेल्यास त्यांच्याकडून, आमच्याकडे खातेच नाही, असे ठरावीक उत्तर ऐकावयास मिळत आहे, असे विरोधी पक्षनेते अजय भट यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा