देशभरात आजपासून (१६ डिसेंबर) दोन महत्वाचे बदल लागू झाले आहेत. यामध्ये आरबीआयद्वारे ऑनलाइन बँकिंग ट्रान्जॅक्शन आणि ट्रायद्वारे मोबाईल नंबर पोर्ट करण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, आज मध्यरात्रीपासूनच ऑनलाइन पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरच्या (एनईएफटी) सुविधेचा २४ तास लाभ घेता येणार आहे. तसेच आजपासूनच मोबाईल क्रमांक कायम ठेऊन सर्व्हिस प्रोव्हायडर बदलण्याच्या म्हणजेच नंबर पोर्टेबिलिटी सुविधा अधिक सोपी करण्यात आली आहे.
Reserve Bank of India: RBI operationalized NEFT 24×7 basis from today 12:00 am. This ensures availability of anytime electronic funds transfer. Between 12:00 am and 8:00 am this morning, NEFT settled over 11.40 lakh transactions. pic.twitter.com/2llgQbQXLO
— ANI (@ANI) December 16, 2019
२४ तास एनइएफटी सुविधा
आजपासून एनइएफटी सुविधा आठवड्यातील सर्व दिवस कोणत्याही वेळेत (२४/७) वापरता येणार आहे. यापूर्वी या सेवेचा लाभ २४ तास मिळत नव्हता. गेल्या काही दिवसांपूर्वी आरबीआयने डिजीटल देवाण-घेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी याची घोषणा केली होती. आजवर एनइएफटीद्वारे पैशांचा व्यवहार सकाळी ८ ते संध्याकाळी ७ या वेळेतच करता येत होता. तर पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंतच ही सुविधा वापरता येत होती. एनइएफटीद्वारे एका वेळी २ लाख रुपयांची रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करता येऊ शकते.
कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही
एनइएफटी ट्रॅन्जॅक्शनमध्ये कोणताही अडथळा येऊ नये आरबीआयने सर्व बँकांना आपल्या चालू खात्यात कायम पुरेशी रक्कम ठेवण्यास सांगितले आहे. दरम्यान, एनईएफटी आणि आरटीजीएस या दोन्ही ऑनलाइन ट्रॅन्जॅक्शनवरील शुल्क यापूर्वीच बंद करण्यात आलं आहे.
३ ते ५ दिवसांत होणार मोबाईल नंबर पोर्ट
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीत सुधारणा करण्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. यामध्ये १६ डिसेंबरपासून पोर्टिंगची प्रक्रिया वेगवान आणि सहज होणार असल्याचे म्हटले होते. या नव्या नियमानुसार, आता सर्व्हिस एरियाच्या आतमध्ये जर कोणी नंबर पोर्टेबिलिटीसाठी अर्ज केला तर त्यावर ३ कामांच्या दिवसांमध्ये पूर्ण करणे बंधनकारक आहे. तर एका सर्कलपासून दुसऱ्या सर्कलमधील अर्जावर ५ कामांच्या दिवसांमध्ये पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. मात्र, कॉर्पोरेट मोबाइल कनेक्शन्ससाठीच्या पोर्टिंगच्या कालावधीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.