देशात पहिल्यांदाच २०० रूपयांची नोट उद्यापासून (शुक्रवार) चलनात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. ही घोषणा करतानाच या नोटेचा नमुनाही सार्वजनिक करण्यात आला. यापूर्वी बुधवारी सरकारने २०० रूपयांची नोट चलनात आणण्याच्या वृत्ताला पहिल्यांदाच दुजोरा दिला होता. परंतु, ही नोट सप्टेंबर महिन्यात चलनात आणली जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. देशात १०० आणि ५०० रूपयांमधील एखादी नोट चलनात आणण्याची ही देशातील पहिलीच वेळ असेल.

कशी असेल नवी नोट जाणून घ्या.. 

समोरील बाजूने अशी असेल नोट

१. नोटेकडे निरखून पहिल्यानंतर एक इमेज दिसेल त्यात २०० लिहिलेलं असेल.

२. देवनागरीमध्ये २०० लिहिलेलं असेल.

३. मध्ये महात्मा गांधींचा फोटो असेल.

४. RBI’, ‘भारत’, ‘India’ आणि ‘200’ हे छोट्या अक्षरात लिहिलेले असेल.

५. सिक्युरिटी थ्रेडमध्ये ‘भारत’ आणि ‘RBI’ लिहिलेले असेल. नोट हलवल्यास तिचा रंग हिरव्या-निळ्या बदलेलं दिसेल.

६. महात्मा गांधींच्या छायाचित्राच्या उजव्या बाजूस गॅरंटी क्लॉज, प्रॉमिस क्लॉजबरोबर गव्हर्नरची स्वाक्षरी आणि आरबीआयचे प्रतिक असेल.

७. नोटेच्या खालील बाजूस उजव्या बाजूस रूपयाचे प्रतिक ‘₹’ बरोबर २०० रंग बदलणाऱ्या शाईत असेल. त्याचा रंग बदलून हिरवा व निळा दिसेल.

८. डाव्या बाजूला वरील बाजूस आणि उजव्या बाजूच्या खालच्या बाजूस छोट्या अंकातून मोठ्या अंकाकडे जाणारा नंबर पॅनल असेल.

९. उजव्या बाजूच्या खालच्या बाजूस ₹200 असे लिहिलेले असेल. ही नोट हलवून पाहिल्यास हिरवा-निळा रंग दिसून येईल.

१०. उजव्या बाजूस अशोक स्तंभाचे चिन्ह असेल.


मागील बाजूने अशी दिसेल नोट

१. नोटेच्या डाव्या बाजूस छपाईचे वर्ष दिसेल.

२. स्वच्छ भारत अभियानाचा लोगो

३. विविध भाषांचे पॅनेल

४. देवानगरी लिपीत दो सौ रूपये (२००) लिहिलेलं असेल.

आकार
२०० रूपयांची नवी नोट ही ६६ मिमी रूंद आणि १४६ मिमी लांब आहे.

Story img Loader