देशात ‘आयआयटी-मुंबई’ अव्वल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिक्षण क्षेत्रातील क्यूएस (क्वाकक्वारेली सायमंड्स) या ब्रिटिश कंपनीने केलेल्या भारतीय शिक्षणसंस्थांच्या मूल्यमापनात आयआयटी-मुंबईला सर्वोत्तम मानांकन मिळाले आहे. तर इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरूला दुसरे आणि आयआयटी-मद्रासला तिसरे स्थान मिळाले आहे. वाचा सविस्तर

ऑक्टोबरअखेरीस दुष्काळाबाबत निर्णय?
ऑक्टोबरमधील काहिलीच्या तडाख्याने १५ दिवसांत धरणांतील पाणीसाठा दोन टक्क्यांनी घटला असून टॅंकरची संख्याही ५०ने वाढून ३८० पर्यंत पोहोचली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार राज्यातील या दुष्काळी परिस्थितीची पाहणी पालकमंत्र्यांनी तालुक्यांत जाऊन केली आहे. ते मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळी परिस्थितीचा वृत्तांत कथन करतील. त्याचबरोबर ३१ जिल्ह्य़ांतील १७९ तालुक्यांमध्ये महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी काही दिवसांत पीक उत्पादन, भूजल पातळी, पाणीसाठे, पावसाची तूट आदी निकषांवर गावांतील परिस्थितीची पडताळणी करणार आहेत. त्यांच्या अहवालाच्या आधारे ऑक्टोबरच्या अखेरीस दुष्काळीबाबत निर्णय जाहीर होईल. वाचा सविस्तर

नाशिक-नगर विरुध्द मराठवाडा पाणीसंघर्ष पेटणार

पुरेशा पावसाअभावी नाशिक, नगर जिल्ह्य़ातील अनेक भागात दुष्काळाचे सावट असतांना उर्ध्व भागातील धरणांतील जलसाठय़ाचा रब्बी हंगामात लाभ होण्याची आशा धूसर होण्याच्या मार्गावर आहे. कारण, तहानलेल्या मराठवाडय़ातील जायकवाडी धरणात नाशिक, नगरमधून या वर्षी पाणी सोडावे लागणार आहे. मराठवाडय़ाची १२ टीएमसीची मागणी असली तरी नियमाने साडे सहा टीएमसी पाणी द्यावे लागणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. वाचा सविस्तर

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

घरपोच ऑनलाइन दारू पोहचवण्याच्या गेल्या दोन दिवसांतील घडामोडीवर उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकावर टीका केली आहे. विद्यमान सरकारने घरोघरी ‘बार’ उघडण्याचा परवाना देऊन ‘क्रांतिकारक’ पाऊल टाकले. घरोघरी दारू पोहोचवू व लोकांना अशा प्रकारे धुंद करू असे वचन पंतप्रधान मोदी यांनी निवडणूकपूर्व भाषणात दिले नव्हते. असं म्हणत ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून शिवसेनेने मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य केले आहे. वाचा सविस्तर

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे निधन

जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले आहे. ते कर्करोगाने ग्रस्त होते. अॅलन यांनी आपले बालपणीचे मित्र बिल गेट्स यांच्यासह मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. वाचा सविस्तर