निवृत्त झाल्यानंतर पहिल्या लोकपालपदासाठी आपली एकमताने तसेच कोणत्याही वादाविना निवड होणार असेल तर ते पद स्वीकारण्यास तयार आहोत, असे सांगून मावळते सरन्यायाधीश पी. सतशिवम् यांनी आपण यापुढेही अन्य काम स्वीकारण्यास तयार असल्याचे संकेत शुक्रवारी येथे दिले.
लोकपालपदाखेरीज राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे प्रमुखपद किंवा तत्सम पद स्वीकारण्याचीही तयारी सतशिवम् यांनी दर्शविली आहे. दरम्यान, सतशिवम् यांचे उत्तराधिकारी न्या. राजेंद्रमल लोढा हे शनिवारी सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
मावळते सरन्यायाधीश पहिले लोकपाल होण्यास उत्सुक !
निवृत्त झाल्यानंतर पहिल्या लोकपालपदासाठी आपली एकमताने तसेच कोणत्याही वादाविना निवड होणार असेल तर ते पद स्वीकारण्यास तयार आहोत, असे सांगून मावळते सरन्यायाधीश पी. सतशिवम् यांनी आपण यापुढेही अन्य काम स्वीकारण्यास तयार असल्याचे संकेत शुक्रवारी येथे दिले.
First published on: 26-04-2014 at 01:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ready to be lokpal if decision is unanimous cji sathasivam