निवृत्त झाल्यानंतर पहिल्या लोकपालपदासाठी आपली एकमताने तसेच कोणत्याही वादाविना निवड होणार असेल तर ते पद स्वीकारण्यास तयार आहोत, असे सांगून मावळते सरन्यायाधीश पी. सतशिवम् यांनी आपण यापुढेही अन्य काम स्वीकारण्यास तयार असल्याचे संकेत शुक्रवारी येथे दिले.
लोकपालपदाखेरीज राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे प्रमुखपद किंवा तत्सम पद स्वीकारण्याचीही तयारी सतशिवम् यांनी दर्शविली आहे. दरम्यान, सतशिवम् यांचे उत्तराधिकारी  न्या. राजेंद्रमल लोढा हे शनिवारी सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा