अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी नवी दिल्लीत मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. याशिवाय अधिवेशन सुरळीत पार पाडण्यास विरोधक मदत करतील अशी आशा असल्याचेही ते म्हणाले.
‘जेएनयू’तील संघर्ष चिघळला
आपण फक्त भाजपचे पंतप्रधान नसून या देशाचे पंतप्रधान आहोत, त्यामुळे विरोधक खासदारांच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचे मोदींनी विरोधी पक्षाच्या खासदारांना सांगितल्याचे नायडू म्हणाले. दरम्यान, विरोधकांनी पंतप्रधानांनी ‘जेएनयू’ वादावर साधलेले मौन सोडण्याचे आवाहन केले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू ) विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष कन्हय्या कुमार याला राष्ट्रविरोधी घोषणाबाजी केल्याने देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून याप्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन ‘जेएनयू’ वादाने गाजण्याची चिन्हे आहेत.

Story img Loader