पीटीआय, बीजिंग

भारतात होत असलेली या वर्षीची जी-२० शिखर परिषद यशस्वी व्हावी यासाठी सर्व पक्षांबरोबर काम करायला तयार असल्याचे चीनने मंगळवारी स्पष्ट केले. भारताने या परिषदेचे यजमानपद भूषवण्यास आपण पाठिंबा दिला होता, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
kalyan session and district court verdict on mandir masjid issue at durgadi fort
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला शासनाच्या मालकीचा; न्यायालयाने मुस्लिम संघटनेचा दावा फेटाळला
nepal prime minister kp oli visit china importance in perspective on Belt and Road
पंतप्रधानपद पणाला लावून चीनशी सहकार्य!
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य

नवी दिल्लीमध्ये ९ आणि १० सप्टेंबरला शिखर परिषदेसाठी सर्व देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी आपापली उपस्थिती कळवली आहे. मात्र, चीनचे खरे सत्ताधारी असलेले अध्यक्ष क्षी जिनिपग या परिषदेला उपस्थित राहणार नसून कमी अधिकार असलेले पंतप्रधान ली कियांग परिषदेसाठी येणार आहेत. जी-२० समूहाला चीनने नेहमीच महत्त्व दिले आहे.आणि त्याच्याशी संबंधित उपक्रमांमध्येही सहभाग घेतला आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

हेही वाचा >>>India to Bharat : भारत नावासंदर्भात मोदी सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनात प्रस्ताव आणणार? केंद्रीय मंत्री म्हणतात…

’भारत आणि चीनदरम्यान असलेल्या सीमावादाचा उल्लेख न करता प्रवक्त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांचे संबंध एकंदरीत स्थिर आहेत आणि विविध स्तरांवर चर्चा व संवाद सुरू आहेत. भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये सातत्याने सुधारणा होत राहिल्यास दोन्ही देश आणि दोन्ही देशातील लोकांच्या हिताचे आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

Story img Loader