कोणत्याही विवाहित जोडप्यासाठी घटस्फोट ही एक मानसिक तणावाची आणि वेदनादायक बाब ठरते. त्यामुळे विवाहसंस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह हल्लीच्या काळात उपस्थित केलं जाऊ लागलं आहे. अमेरिकेतील विवाह व्यवस्थेसंदर्भात फोर्ब्सनं नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेमधून काही धक्कादायक तपशील समोर आले आहेत. त्यामुळे एकंदरीतच अमेरिकेतील विवाह व्यवस्था धोक्यात आली आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या सर्व्हेमध्ये अमेरिकेत होणाऱ्या घटस्फोटांमागचं सर्वात मुख्य कारणही मांडण्यात आलं आहे.

काय आहे सर्व्हेमध्ये?

फोर्ब्स अॅडव्हायजरी सर्व्हेच्या माध्यमातून अमेरिकेतील विवाह व्यवस्थेबाबत आणि प्रामुख्याने देशात वाढत्या घटस्फोटांच्या पार्श्वभूमीवर यामागच्या कारणांचा आढावा घेण्यात आला. यात घटस्फोटासाठीचं मुख्य कारण, लग्नानंतर किती काळात घटस्फोट होतात, घटस्फोट होण्याआधी दाम्पत्यामध्ये तणाव वाढल्याची कोणती लक्षण दिसत होती यासंदर्भात घटस्फोटित व्यक्तींकडून माहिती गोळा करण्यात आली. या माहितीच्या आधारे समोर आलेले निष्कर्ष एकंदरीत अमेरिकेच्या विवाह व्यवस्थेबाबच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे असल्याचं सांगितलं जात आहे.

Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
WhatsApp Wedding Invitation Scam Scammers Are Using New Tricks To Steal Your Money
व्हॉट्सअ‍ॅपवर आलेली लग्नपत्रिका डाऊनलोड करताय? मग सावधान, अन्यथा तुमचा मोबाईल हॅक झालाच म्हणून समजा
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?
actor amit tandon cheated wife ruby tandon
पत्नीची अनेकदा फसवणूक केली, अभिनेत्याचा स्वतःच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल खुलासा; घटस्फोट घेतल्यावर सहा वर्षांनी पुन्हा तिच्याशीच केलं लग्न
Krish Jagarlamudi married to Hyderabad doctor
Video: प्रसिद्ध दिग्दर्शकाने ४६ व्या वर्षी गुपचूप उरकलं दुसरं लग्न; डॉक्टरशी बांधली लग्नगाठ, व्हिडीओ आला समोर
army man killed his wife for immoral relationship and dead body throw in river
विवाहित सैनिकाचा तरुणीवर जडला जीव… पत्नी अडथळा ठरत असल्याने थेट नदीत…

काय आहेत निष्कर्ष?

या सर्व्हेबाबत हिंदुस्तान टाईम्सनं सविस्तर वृत्त दिलं आहे. या सर्व्हेतील निष्कर्षांनुसार, अमेरिकेतील सर्वाधिक म्हणजेच ७३ टक्के घटस्फोट हे दोघांपैकी एका कुणाच्यातरी आग्रहाखातर लवादासमोर जातात आणि त्यातून ते पती-पत्नी विभक्त होतात. त्यामुळे फत्त २७ टक्के दाम्पत्य एकमताने घटस्फोट घेतात.

तिसऱ्या व सातव्या वर्षी सर्वाधिक घटस्फोट

विवाहानंतर तिसऱ्या व सातव्या वर्षी यातले सर्वाधिक घटस्फोट झाल्याचा निष्कर्ष सर्व्हेतून मांडण्यात आला आहे. तसेच, विवाहानंतर १० वर्षं एकत्र राहिल्यानंतर फक्त ४ टक्के दाम्पत्य घटस्फोट घेत असल्याची बाबही समोर आली आहे.

forbes advisor survey
फोर्ब्सच्या निष्कर्षातून काय आलंय समोर?

तसेच, घटस्फोटानंतर तब्बल ९२ टक्के व्यक्तींनी दुसरं लग्न वगैरे मार्गाने नव्या आयुष्याला सुरुवात केल्याची बाबही या निष्कर्षांमध्ये अधोरेखित करण्यात आली आहे.

सर्वाधिक घटस्फोट कोणत्या कारणामुळे?

दरम्यान, सामान्यपणे घटस्फोटासाठी पती किंवा पत्नीकडून एकमेकांची प्रतारणा करणे हे मानलं जातं. मात्र, अमेरिकेत वचनबद्धतेचा अभाव व कौटुंबिक जबाबदाऱ्यांची जाणीव नसणं ही सर्वाधिक म्हणजेच ६३ टक्के घटस्फोटांसाठी महत्त्वाची कारणं ठरल्याचं समोर आलं आहे. या गोष्टी नात्यात असत्या, तर घटस्फोटापर्यंत वाद गेलेच नसते, असं या घटस्फोटित दाम्पत्यांचं म्हणणं होतं.

विवाहाच्या पहिल्याच वर्षात घटस्फोट घेणाऱ्या दाम्पत्यांपैकी ५९ टक्के दाम्पत्यांनी एकमेकांशी न जुळल्याचं कारण दिलं आहे. एकमेकांशी प्रतारणा करून विवाहबाह्य संबंध ठेवणे हेही घटस्फोटांमागचं एक महत्त्वाचं कारण राहिलं आहेच. जवळपास ३४ टक्के लोकांनी हे कारण दिलं आहे. त्यामुळे विवाहबाह्य संबंध ही अमेरिकेच्या विवाह व्यवस्थेसमोरची महत्त्वाची समस्या ठरली आहे.

बेरोजगारीत इन्स्टाग्रामवर फुललं प्रेम; OYO रुमवर सात जन्माची वचने, नोकरी लागताच तरुण म्हणतो तू कोण?

५० टक्के लोकांची पहिली लग्नं टिकत नाहीत!

अमेरिकेत होणाऱ्या एकूण लग्नांपैकी सरासरी ५० टक्के पहिली लग्न टिकत नसल्याची बाब या सर्व्हेतून समोर आली आहे. तसेच, एकट्या २०२१ या वर्षात अमेरिकेत तब्बल ६ लाख ८९ हजार ३०८ घटस्फोट झाल्याची माहिती फोर्ब्स अॅडव्हायजरकडून देण्यात आली आहे.

वाद वाढल्याची लक्षणं काय होती?

दरम्यान, प्रकरण घटस्फोटापर्यंत जाण्याआधी दाम्पत्यांमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी किंवा लक्षणं जाणवत होती, यासंदर्भातही सर्वेक्षणात माहिती गोळा करण्यात आली आहे. त्यानुसार, एकमेकांबद्दल वाटणारी आवड कमी होत जाणे, वाद सोडवण्याचे अपुरे किंवा अपयशी प्रयत्न आणि एकमेकांना टाळणे ही तीन महत्त्वाची लक्षणं या घटस्फोटित दाम्पत्यांनी अधोरेखित केली.