Padma Awards2024:गणतंत्र दिवसाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. यावर्षी ३४ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये देशाची पहिली महिला माहुत पार्वती बरुआ, हेमचंद मांझी आणि यानुंग जमोह यांच्या नावांचा सामवेश आहे. २३ जानेवारी या दिवशी सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत जननायक कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पार्वती बरुआ, देशाच्या पहिल्या महिला माहुत

आसामच्या गौरीपूरमधील राजघराण्याशी संबंध असलेल्या पार्वती बरुआ यांना सुरुवातीपासून प्राण्यांविषयी खास आपुलकी वाटत होती. हत्ती या प्राण्याबाबत त्यांना विशेष आस्था होती. त्यांनी आयुष्यभर प्राण्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. पार्वती बरुआ एशियन एलिफंट स्पेशालिस्ट, आययूसीएनच्या सदस्यही आहेत. हत्तींसाठी त्यांनी खूप मोठं कार्य केलं आहे. त्यांच्या आयुष्यावर अनेक माहितीपटही तयार झाले आहेत.

यानुंग जमोह लेगो

पूर्व सियांगमध्ये राहणारे यानुंग जमोह लोगो हे आयुर्वेदिक औषधांचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी आत्तापर्यंत १० हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. तसंच एक लाख रुग्णांना त्यांनी आयुर्वेदिक औषधं कशी वापरायची हे शिकवलं आहे. SHGs ला या वनस्पतींची, जडीबुटींच्या वापराची ट्रेनिंग दिली आहे.

हेमचंद मांझी

नारायणपूर येथील हेमचंद मांझी यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. मागच्या पाच दशकांहून अधिक काळ खेडे गावात राहणाऱ्या लोकांना आरोग्य सेवा योग्य पद्धतीने मिळते आहे का? याची व्यवस्था ते पाहतात. वयाच्या १५ व्या वर्षांपासून त्यांनी गरजू रुग्णांची सेवा करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

चामी मुर्मू

चामी मुर्मू यांनी मागच्या २८ वर्षांमध्ये २८ हजार महिलांनना स्वयंरोजगार मिळवून दिले आहेत. त्यांच्या या योगनादानासाठी त्याना नारी शक्ती पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिवस २०१९ च्या दिवशी एका कार्यक्रमात त्यावेळी राष्ट्रपती पदावर असलेल्या रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही झाला आहे.

जागेश्वर यादव

छत्तीसगढ येथील जशपूरचे आदिवासी कार्यकर्ते जागेश्वर यादव यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल पद्मश्री दिला जाणार आहे.

दुखू माझी

पश्चिम बंगालमधल्या पुरुलिया सिंदरी गावातले आदिवासी पर्यावरणवादी दुखू माझी यांनाही सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. त्यांनी वनीकरणासाठी केलेले प्रयत्न अनन्यसाधारण आहेत. त्यांनी रोज आपल्या सायकलवर प्रवास करत ५ हजारांहून अधिक वडाची झाडं, आंब्याची झाडं आणि ब्लॅकबेरी झाडं लावली आहेत.

संगथंकिमा

मिझोरम येथील सर्वात मोठा अनाथ आश्रम चालवणारे सामाजिक कार्यकर्ते संगथंकिमा यांना सामाजिक कार्यातल्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलं जाणार आहे.

गुरविंदर सिंह

हरियाणातील सिरसा या ठिकाणी काम करणारे दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते गुरविंदर सिंह यांनाही पद्मश्री पुरस्कार दिला जाणार आहे. बेघर, अनाथ, महिला, दिव्यांग यांच्यासाठी त्यांनी खूप मोठं कार्य केलं आहे.

के. चेल्लम्मल

अंदमान निकोबार येथील जैविक शेती करणारे के. चेल्लम्मल यांना त्यांच्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रेमा धनराज

प्रेमा धनराज प्लास्टिक रिकंस्ट्रक्टिव्ह सर्जन आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. आगीमध्ये जे होरपळतात त्यांच्या उपचारांच्या, सुश्रुषेचं काम त्या करतात. त्यांच्या याच योगदानासाठी त्यांना पद्मश्री जाहीर झाला आहे.

सोमण्णा

मैसूर येथील सामाजिक कार्यकर्ते सोमण्णा यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर जाला आहे. जेनु कुरुबा या जमातीसाठी ते गेल्या चाळीस वर्षांपासून कार्यरत आहेत.

सत्यनारायण बेलेरी

कासरगोडचे तांदूळ उत्पादक शेतकरी सत्यनारायण बेलेरी यांना कृषी क्षेत्रातल्या योगदानासाठी पद्मश्रीने गौरवण्यात येणार आहे.

सरबेश्वर वसुमतारी

चिरांग येथील आदिवाशी शेतकरी सरबेश्वर बसुमतारी यांनाही शेतीतल्या योगदानासाठी पद्मश्री जाहीर झाला आहे.

उदय विश्वनाथ देशपांडे

आंतरराष्ट्रीय मल्लखांब कोच उदय विश्वनाथ देशपांडे यांना मल्लखांब या खेळातल्या योगदानासाठी आणि तो खेळ पुन्हा लोकांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी पद्मश्री देण्यात येणार आहे. त्यांनी ५० देशांमध्ये पाच हजारांहून अधिक लोकांना मल्लखांबाचं प्रशिक्षण दिलं आहे.

यज्दी मानकेशा इटली

मायक्रोबायोलॉजिस्ट यज्दी माणकेशा इटली यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

शांती देवी पासवान आणि शिवन पासवान

दुसाध समुदायाचं दाम्पत्य शांती देवी पासवान आणि शिवन पासवान हे दोघंही चित्रकार आहेत. अमेरिका, जपान, हाँगकाँग या देशांमध्ये चित्रप्रदर्शनं भरवली आहेत. तसंच २० हजारांहून अधिक महिलांना त्यांनी प्रशिक्षित केलं आहे. त्याचसाठी या दाम्पत्यालाही पद्मश्री पुरस्कार दिला जाणार आहे.

अशोक कुमार विश्वास

अशोक कुमार विश्वास यांना टिकुलीचे भीष्म असं म्हटलं जातं. विपुल टिकुली पेंटरच्या पुनर्स्थापनचं श्रेय त्यांना जातं. त्यांनी ८ हजारांहून अधिक महिला कलाकारांना मोफत प्रशिक्षण दिलं आहे.

बालकृष्णन सदनम पुथिया वीटिल

कल्लू कथकली गुरु बालकृष्णन सदनम पुथिया वीटिल यांना पद्मश्री पुरस्कार दिला जाणार आहे. त्यांनी २५ देशांमधल्या ३० आंतरराष्ट्रीय महोत्सवांची शोभा आपल्या नृत्याने वाढवली आहे.

उमा माहेश्वरी डी

उमा महेश्वरी डी यांना स्वर महेश्वरी या नावानेही ओळखलं जातं. ये पहिल्या महिला हरिकथा प्रतिपादक आहेत. संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rebublic day padma awards 2024 34 unsung heroes of receiving padma shri this year scj