देशात अग्निपथ योजनेला विरोधात सुरु असताना भारतीय वायू दलात या योजनेंतर्गत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी रेकॉर्ड ब्रेक अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती भारतीय वायू सेनेने दिली आहे.
यापूर्वी झालेल्या भरती प्रक्रियेदरम्यान सर्वाधिक ६,३१,५२८ अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, अग्निपत योजनेंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत यंदा ७,४९,८९९ अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती भारतीय वायू सनेच्यावतीने देण्यात आली आहे.
तिन्ही सैन्य दलात होणाऱ्या भरती प्रक्रियेत बदल करत केंद्र सरकारने नवीन अग्निपथ योजना जाहीर केली होती.
अग्निपथ भरती योजना; पाहा व्हिडीओ –
मात्र, या योजनेला तरुणांनी मोठ्या प्रमाणात विरोधात केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता या योजनेसाठी लागणारी वयोमर्यादा २१ वरून २३ वर्ष केली होती.