हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
२७ कोटी ३३ लाख टन उत्पादन; गहू, तांदूळ व डाळींचा उच्चांक
गेल्या वर्षी म्हणजे २०१६ मध्ये झालेल्या दमदार मान्सूनने चालू वर्षांमध्ये (जुलै-जून २०१६-१७) अन्नधान्य उत्पादनाचा नवा विक्रम केल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केली. तिसऱ्या आणि अंतिम आढाव्यानुसार, देशामध्ये यंदा २७ कोटी ३३ लाख टन धान्योत्पादन अपेक्षित आहे. एकटय़ा उसाचा अपवाद वगळल्यास तांदूळ, गहू, डाळी, तेलबिया आदींच्या उत्पादनाने यंदा नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.
राज्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर केंद्रीय कृषी खाते दरवर्षी तीन अंदाज व्यक्त करते. फेब्रुवारीमधील दुसऱ्या आढाव्यानुसार, २७ कोटी १९ लाख टन उत्पादनाचा अंदाज धरला होता. पण त्यात आणखी वाढ होऊन अंतिम अंदाज २७ कोटी ३३ लाख टनांवर पोचला. हे उत्पादन आतापर्यंतचे सर्वाधिक विक्रमी आहे. यापूर्वीचा विक्रम २०१३-१४ मध्ये होता. त्या वेळी २६ कोटी ५० लाख टन उत्पादन झाले होते. त्याच्या तुलनेत यंदाचे उत्पादन सुमारे ८० लाख टनांहून (३.१५ टक्के) अधिक आहे. मागील वर्षीच्या (१५-१६) तुलनेत तर तब्बल २ कोटी १८ लाख टन (८.६७ टक्के) अधिक आहे.
मागील वर्षांच्या तुलनेत तांदळाच्या उत्पादनात २५ लाख टनांची, गव्हामध्ये ४८ लाख टनांची, भरड धान्यांमध्ये ५८ लाख टनांची, डाळींमध्ये ६० लाख टनांची आणि तेलबियांमध्ये तब्बल ७२ लाख टनांची भर पडल्याची आकडेवारी आहे.
उसात घट
तामिळनाडूतील साखरपट्टय़ात पावसाने चांगलीच ओढ दिल्याचा फटका ऊस उत्पादनाला बसल्याचे दिसते आहे. मागील वर्षी उसाचे उत्पादन ३४ कोटी ८४ लाख टन होते, पण यंदा ते ४.२४ कोटी टनाने घसरून (-१२.१७ टक्के) ३० कोटी ६० लाख टनांवर आले आहे. याउलट लागवडीचे क्षेत्र घटूनही कपाशीच्या उत्पादनात जवळपास ९ टक्क्यांची (३ कोटींवरून ३.२५ कोटी गाठींपर्यंत) घसघशीत वाढ झाली आहे.
पुढील वर्षांचाही दमदार अंदाज
यंदाही दमदार मान्सून पडण्याच्या अंदाजाने कृषी मंत्रालयाने पुढील वर्षीसुद्धा (२०१७-१८) २७ कोटी ३० लाख टन धान्योत्पादनाचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. यामुळे कृषिक्षेत्राचा विकासदर सरासरी चार टक्क्यांहून अधिक राहण्याचा आणि पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होण्याची खात्री सरकारला वाटते आहे.