टर्कीचे धाबे दणाणले आहेत. टर्कीत यंदा महागाईत (Inflation) तब्बल ६१ टक्क्यांनी वाढ झालीय. हा मागील २९ वर्षांमधील उच्चांक आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरांचं आर्थिक नियोजन अक्षरशः कोलमडलं आहे. फेब्रुवारीत महागाईचा दर ५५.४४ टक्के होता, तो आता ६१ टक्क्यांवर गेलाय. ग्राहक खरेदी करत असलेल्या वस्तूंच्या किमतीत फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये ५.४६ टक्क्याने वाढ झालीय.

टर्कीच्या सांख्यिकीय संस्थेच्या आकडेवारीनुसार, टर्कीतील सर्वाधिक महागाई वाहतूक विभागातील आहे. वाहतूक क्षेत्रात ९९.१२ टक्क्यांनी महागाई वाढली आहे. अन्नपदार्थांच्या किमतीत ७०.३३ टक्के वाढ झालीय. मार्च २००२ नंतरची ही सर्वाधिक महागाई आहे. टर्कीतील ही वाढती महागाई करोना साथीरोगानंतर तयार झालेल्या परिस्थितीचा भाग आहे. याशिवाय रशिया आणि युक्रेनमधील युद्धाने टर्कीत इंधन आणि धान्याच्या किमतीतही मोठी वाढ केली.

महागाईचा परिणाम म्हणून टर्कीत व्याजदरातही कपात करण्यात आली. टर्कीच्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार जास्त व्याजदरामुळे महागाईचा भडका उडाला. त्यामुळे गुंतवणुकीला चालना देण्यासाठी व्याजदरात कपात करण्यात आली. सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान व्याज दरात ५ टक्क्यांनी कपात करण्यात आली. मात्र, वार्षिक १४ टक्के व्याजदर कायम राहिला.

हेही वाचा : गुढीपाडव्याच्या निमित्ताने भाजपा खासदाराकडूनच महागाईवर चिंता, म्हणाले, “या सगळ्या पीडा…”

या महागाईने सर्वसामान्य नागरिक होरपळून जाऊ नये म्हणून आता टर्कीच्या सरकारने मुलभूत गोष्टींवरील कर कमी केला आहे. तसेच वीजबिलांबाबतही काहिसा दिलासा देण्यात आलाय.

Story img Loader