पीटीआय, नवी दिल्ली

उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांत २,६८,९२३ विद्यार्थी अमेरिकेत गेले असून हा सर्वकालीन उच्चांक आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.अमेरिकेत शिकणाऱ्या १० लाखांहून अधिक परदेशी विद्यार्थ्यांपैकी भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण २५ टक्क्यांहून अधिक  आहे आणि सलग तिसऱ्या वर्षी उच्च शिक्षण  घेण्यासाठी विक्रमी संख्येने भारतीय विद्यार्थ्यांनी या देशात प्रवास केला आहे, असे ‘ओपन डोअर्स’ अहवालात म्हटले आहे.

Salary of hourly professors at Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University is overdue
नागपूर विद्यापीठाच्या तिजोरीत ठणठणाट? तासिका प्राध्यापकांचे वेतन थकले
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
OBC Hostels, OBC , OBC Monthly Allowance ,
‘लाडक्या बहिणी’ तुपाशी, ओबीसी विद्यार्थी उपाशी, चार महिन्यांपासून…
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ
Foreign Education Concepts Misconceptions Idea of ​​Education Career news
जावे दिगंतरा: परदेशी शिक्षण : समजगैरसमज
yavatmal Adv Pranav Vivek Deshmukh graduated from London School of Economics
यवतमाळचा विद्यार्थी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत
graduates Phd Mumbai University, Mumbai University,
मुंबई विद्यापीठातून यंदा ४०१ स्नातकांना पी.एचडी, मुंबई विद्यापीठाचा मंगळवारी पदवी प्रदान सोहळा
loksatta readers feedback
लोकमानस: पिढ्या बरबाद करणारे धोरण

‘‘अमेरिकेमधील प्रत्येक भारतीय विद्यार्थी आणि त्यांच्या यशाला पािठबा देणारे कुटुंब या यशासाठी मान्यतेस पात्र आहेत. परदेशात शिक्षण घेण्याचा निर्णय आणि तुमची अमेरिकेची निवड तुमच्याद्वारे केलेली मौल्यवान गुंतवणूक दर्शवते. भारत व अमेरिका या देशांना तुम्ही अधिक जवळ आणत आहात आणि आम्हाला उज्ज्वल भविष्याकडे नेत आहात,’’ असे भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी म्हणाले.‘ओपन डोअर्स’ अहवालाच्या आकडेवारीनुसार, २००९-१० नंतर प्रथमच अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय पदवीधर विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा स्रोत बनण्यासाठी भारताने चीनला मागे टाकले आहे. भारतीय पदवीधर विद्यार्थ्यांची संख्या ६३ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ६४ हजार विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे, तर भारतीय पदवीधर विद्यार्थ्यांची संख्याही १६ टक्क्यांनी वाढली आहे.

Story img Loader