स्वतंत्र तेलंगणाच्या पेचप्रसंगावर लवकरात लवकर तोडगा काढावा या मागणीसाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.
रेड्डी यांनी १० जनपथ या काँग्रेस अध्यक्षांच्या निवासस्थानी सोनियांशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. या वेळी सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेलही उपस्थित होते. रेड्डी यांनी या भेटीत तेलंगणाच्या मुद्दय़ावर राज्यात निर्माण झालेल्या पेचप्रसंगाचे सविस्तर विश्लेषण केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रेड्डी यांनी यापूर्वी काँग्रेस सरचिटणीस आणि आंध्र प्रदेश प्रभारी गुलाम नबी आझाद यांचीही भेट घेतली. तेलंगणाच्या निर्मितीकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तेलंगणा संयुक्त कृती समितीने या महिन्याच्या अखेरीस ‘चलो अ‍ॅसेम्बली’ हे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणी काँग्रेसच्या सात खासदारांनी आपले राजीनामे पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे यापूर्वीच सुपूर्द केले आहेत.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा