जम्मू-काश्मीरमधील थंडी काढता पाय घेण्याची चिन्हे अद्यापही दिसत नाहीत. काश्मीर खोऱ्यातील बहुतांश ठिकाणी तापमानात घट झाली असून स्कीइंग रिसॉर्ट असलेल्या गुलमर्ग येथे रविवारी रात्रीचे तापमान उणे ११.२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते.

मात्र, राज्याची उन्हाळी राजधानी श्रीनगरसह बहुतांश ठिकाणचे तापमान अजूनही गोठणबिंदूखाली असले, तरी आकाश निरभ्र असल्यामुळे येत्या काही दिवसात ते आणखी कमी होण्याचा अंदाज आहे, असे हवामान खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले. हिवाळ्यात खोऱ्याला भेट देणाऱ्या पर्यटकांचे मोठे आकर्षण असलेल्या बर्फाच्छादित गुलमर्गमध्ये आदल्या रात्रीचे तापमान ३.२ अंश सेल्सिअसने घसरले. लडाखमधील कारगिल हे उणे १०.४ अंश सेल्सिअस तापमानासह दुसऱ्या क्रमांकाचे थंड शहर ठरले.  लडाखच्या वाळवंटातील लेह शहराच्या रात्रीच्या तापमानात २.३ अंशांनी वाढ होऊन ते उणे ७ अंश सेल्सिअसवर स्थिरावले. पहलगामच्या तापमानात ३ अंशांनी वाढ होऊन तेथे ०.५ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.

Story img Loader