रिझर्व बँक बँकिंग क्षेत्रात व्यापक सुधारणा आणणार असून, त्यामुळे मोठय़ा प्रमाणात परदेशी बँकांना भारतात प्रवेश करणे शक्य होईल, असे रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रुघुरामन राजन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काही स्थानिक बँकाही त्यांच्या ताब्यात जाणे शक्य असल्याचे त्यांनी मान्य केले.
परदेशी बँकांच्या भारतातील प्रवेशाबाबतच्या धोरणाबाबतचा आराखडा येत्या काही दिवसांत जाहीर केला जाईल. परदेशी बँकांना कोणत्याही खास सवलती देणार नसल्याचे स्पष्ट करतानाच, परदेशात भारतीय बँकांसाठी जी परवान्याची प्रक्रिया आहे त्याच धर्तीवर परदेशी बँकांना प्रवेश दिला जाईल असे त्यांनी सांगितले. त्याच प्रमाणे भारतात येण्यासाठी परदेशी कंपन्यांची येथे शाखा हवी आणि किंवा उपकंपनी हवी अशी अट आहे. तुमच्या संपूर्ण मालकीची ही उपकंपनी झाली की, मोठय़ा प्रमाणात व्यवहारांसाठी मोकळीक मिळेल असे त्यांनी ‘वॉशिंग्टन ऑडियन्सशी’ बोलताना स्पष्ट केले.
भाववाढ हा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने कळीचा मुद्दा असल्याचे त्यांनी मान्य केले. चलनवाढ अटोक्यात आणण्याच्या दृष्टीने पतधोरणात लक्ष केंद्रित केले जाणार आहे. अमेरिकेतील आर्थिक पेचप्रसंगाबाबत भारताला चिंता करण्याचे कारण नाही, असा दिलासा त्यांनी दिला.

Story img Loader