राष्ट्रीय पातळीवर शेवटच्या रांगेतही नसण्याची परंपरा राखलेल्या मराठी चित्रपटाने गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रीय पुरस्कारांवर बाजी मारण्याचा पाडलेला नवा पायंडा यंदाही कायम ठेवला आहे. सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना  ‘अनुमती’ चित्रपटासाठी इरफान खान याच्यासोबत विभागून, तर सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार उषा जाधव यांना ‘धग’ या चित्रपटातील भूमिकेसाठी जाहीर झाला आहे. सवरेत्कृष्ट दिग्दर्शनाच्या पुरस्कारावर ‘धग’ या चित्रपटासाठी शिवाजी लोटन पाटील यांनी, तर ‘संहिता’ चित्रपटातील गाण्यासाठी आरती अंकलीकर-टिकेकर यांनी सर्वोत्तम गायिकेच्या रूपाने मराठी मुद्रा उमटवली आहे.  सवरेत्कृष्ट चित्रपटाचा मानाचा पुरस्कार ‘पान सिंग तोमार’च्या पारडय़ात पडला.
ल्ल     विशेष उल्लेखनीय काय?
चितगांव बंडावरील आधारलेला बेदब्रत पेन यांचा ‘चितगांव’ तसेच सिद्धार्थ सिवा यांचा ‘१०१ चोडियांगल’ (मल्याळी) हे चित्रपट पदार्पणासाठी दिल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी पुरस्काराचे विभागून मानकरी ठरले. लोकप्रिय हिंदी सिनेमाच्या पुरस्कारामध्ये ‘विकी डोनर’ या चित्रपटाने बाजी मारली. याच चित्रपटासाठी अन्नू कपूर आणि डॉली अहलुवालिया यांना साहाय्यक अभिनयाचे पुरस्कार मिळाले. साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मल्याळी अभिनेत्री कल्पना यांनाही विभागून देण्यात आला. स्वतंत्र पटकथेचा पुरस्कार ‘कहानी’ चित्रपटासाठी सुजोय घोष यांना जाहीर झाला, तर रूपांतरित पटकथेचा पुरस्कार  ‘ओ माय गॉड’ चित्रपटासाठी भावेश मंडलिया आणि उमेश शुक्ला यांना मिळाला. ‘कहानी’ चित्रपटाला संकलनाचाही पुरस्कार (नम्रता राव) मिळाला. सवरेत्कृष्ट गीतलेखनाचा पुरस्कार चितगांव चित्रपटातील ‘बोलो ना’ या गाण्यासाठी प्रसून जोशी यांना मिळाला. सर्वोत्तम गायकाचा पुरस्कार शंकर महादेवन यांना मिळाला.
ल्ल बॉलीवूड आणि इतर भाषिक मानकरी?
‘तलाश’, ‘गँग्ज ऑफ वासेपूर’, ‘कहानी’, ‘देख इंडियन सर्कस’ या बॉलीवूड सिनेमांना तसेच बंगाली चित्रपट ‘चित्रगंधा’ याला विशेष ज्युरी पुरस्कार जाहीर झाला. सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार ‘को : याद’ या चित्रपटाला मिळाला. ध्वनीमधील तंत्र पुरस्कार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ आणि दोन मल्याळी चित्रपटांना विभागून मिळाला. ‘कालियाचन’ या मल्याळी चित्रपटाला तसेच ‘संहिता’ या मराठी चित्रपटाला संगीताचा पुरस्कार विभागून मिळाला. स्पेशल इफेक्ट्सचा पुरस्कार ‘एगा’ने पटकावला.  ‘इन्व्हेस्टमेण्ट’ला सवरेत्कृष्ट मराठी चित्रपटाचा (प्रादेशिक) पुरस्कार जाहीर झाला.
मराठी मानकरी
सर्वोत्तम अभिनेता : विक्रम गोखले (विभागून)
सर्वोत्तम अभिनेत्री : उषा जाधव
सवरेत्कृष्ट दिग्दर्शन : शिवाजी लोटन पाटील (धग)
सिनेमॅटोग्राफी : विक्रांत पवार (कातळ) विभागून
सर्वोत्तम गायिका : आरती अंकलीकर-टिकेकर
कला/संस्कृती चित्रपट : गौरी पटवर्धन
संगीत : शैलेंद्र बर्वे (संहिता)

Story img Loader