दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अमरनाथ यात्रेसाठी नोंदणीची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यावेळी ही यात्रा ३० जूनपासून सुरू होणार असून ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाचे सीईओ नितीश्वर कुमार यांनी दोन दिवसांपूर्वी नोंदणीबाबत माहिती दिली होती. जम्मू-काश्मीर प्रशासनाने दक्षिण काश्मीरमधील अमरनाथ धामच्या वार्षिक यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी २० हजार क्षमतेचा यात्री निवास तयार केला आहे. २०२० आणि २०२१ मध्ये, कोविड१९ मुळे, ३,८८० मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेची यात्रा प्रतीकात्मक आधारावर आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे यंदा भाविकांची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. या प्रवासासाठी तुम्ही नोंदणी कशी करू शकता ते जाणून घेऊया.

अमरनाथ यात्रेची तारीख हिंदू कॅलेंडर आणि मासिक शिवरात्रीवर अवलंबून असते. दरवर्षी यात्रेची सुरुवातीची तारीख निश्चित नसते, परंतु यात्रेची शेवटची तारीख श्रावण पौर्णिमा असते. यावेळी अमरनाथ यात्रा ३० जूनपासून सुरू होणार असून ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

Photos : मधुमेहाच्या आजारावर ‘ही’ फळे ठरतात फायदेशीर; आजच आहारात समावेश करा

अमरनाथ यात्रेचा कालावधीही ठरलेला नसतो. हे एका विशिष्ट वर्षी जास्तीत जास्त ३५ दिवस ते ६० दिवसांसाठी निश्चित करण्यात आले आहे. पूर्वी अमरनाथ यात्रा ६० दिवसांसाठी आयोजित केली जात होती, नंतर अनेक स्थानिक समस्यांमुळे हा कालावधी वर्षानुवर्षे कमी होत गेला. यंदा ही यात्रा ४३ दिवसांची असेल.

यात्रेची नोंदणी देशभरातील विविध बँकांसोबतच श्राइन बोर्डाच्या वेबसाइट आणि मोबाइल अ‍ॅपद्वारेही ऑनलाइन करता येईल. ७५ वर्षाखालील आणि १३ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती यात्रेसाठी नोंदणी करू शकतात. यावेळी अमरनाथ यात्रेला देश-विदेशातून सुमारे ३ लाख भाविक येण्याची शक्यता आहे.

भारतीय चलनाबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का? जाणून घ्या काही रंजक बाबी

अमरनाथ यात्रा शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याचे आदेश जम्मू-काश्मीरचे पोलीस प्रमुख दिलबाग सिंग यांनी सुरक्षा दलांना दिले आहेत.डीजीपींनी मध्य काश्मीरमधील गांदरबलला भेट दिली आणि जिल्ह्यातील सुरक्षा परिस्थिती आणि यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला. यात्रा शांततेत पार पडावी यासाठी पोलीस मुख्यालय सर्व प्रकारचे सहकार्य करेल.