भाजप नेते अमित शहा यांच्यावर द्वेषमूलक भाषण केल्याप्रकरणी पुन्हा एकदा भाषणबंदी घालण्यात यावी अशी मागणी अलिग्राह मुस्लिम शिक्षक संघटनेने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
आझमगडमधील भाषणातून अमित शहा यांनी निवडणूक आयोगाचा अपमान केला आहे. तसेच येथील संपूर्ण मुस्लिम समाजाला दहशतवादी ठरविण्याचा प्रयत्न शहा यांनी केल्याचे मुस्लिम शिक्षक संघटनेचे सचिव अफ्ताब अलम म्हटले आहे.
आझमगढ म्हणजे दहशतवाद्यांचा अड्डा – अमित शाह
ते म्हणतात की, “मुझफ्फरनगरमध्ये जो दंगलीचा हाहाकार झाला तोच, येथेही व्हावा आणि मतांचे राजकारण करता यावे यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु असल्याचे या अशा विधानांतून स्पष्ट दिसून येते. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत अमित शहा यांच्यावर बंदी घालावी. जर आयोगालाही कारवाई करणे जमले नाही, तर आम्ही थेट पंतप्रधानांना गाठू आणि अशाप्रकारच्या विधानांपासून देशाला वाचविण्यासाठी विनंती करू.” असेही अफ्ताब अलम म्हणाले. तसेच देशात मोदींची लाट माध्यमांनी घडविली असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यात अमित शहा यांच्यासारख्या नेत्यांची अशी वक्तव्ये देशाची सामाजिक एकता भंग करणारी असल्याचे अलम म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा