Delhi CM Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गु्प्ता यांनी आज रामलीला मैदानात झालेल्या सोहळ्यात शपथ घेतली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव करत भारतीय जनता पक्ष प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सत्तेत आला आहे. या विजयानंतर आता पक्षाला निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वसनांची पूर्तता करावी लागणार आहे. यादरम्यान मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी महिलांना दरमहा २५०० रुपये आर्थिक मदत देणार असल्याचे सांगितले स्पष्ट केले आहे. त्यांनी महिलांना देण्यात येणार असलेल्या आर्थिक मदतीचा पहिला हप्ता ८ मार्चपर्यंत म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनार्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होईल असे आश्वासन गुरुवारी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी त्यांनी यापूर्वीच्या दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारवरही टीका केली. त्यांना त्यांच्या कार्यकाळात खर्च केलेल्या प्रत्येक पैशाचा हिशेब द्यावा लागेल, असेही रेखा गुप्ता म्हणाल्या. दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वी गुप्ता यांनी काश्मिरी गेट येथील श्री मरघाट वाले हनुमान मंदिराला भेट दिली, यावेळी त्या बोलत होत्या.

निवडणूक काळात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या मुद्द्यावर भर देत गुप्ता म्हणाल्या की , “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिल्लीसाठीचे स्वप्न अंमलात आणणे ही आमची जबाबदारी आहे. ८ मार्चपर्यंत महिलांना त्यांच्या खात्यात आर्थिक मदत मिळेल.”

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ४८ जागा जिंकून भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपाने मिळवणाऱ्या महिलांसाठी दरमहा २,५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.

दिल्लीतील रामलीला मैदानात झालेल्या भव्य कार्यक्रमात भाजपा नेत्या रेखा गुप्ता यांच्यासह एकूण सहा आमदारांना मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. परवेश वर्मा (नवी दिल्ली), मनजिंदर सिंग सिरसा (राजौरी गार्डन), रविंद्र कुमार इंद्रज (बवाना), कपिल मिश्रा (करवाल नगर), आशिष सूद (जनकपुरी) आणि पंकज कुमार सिंग (विकासपुरी) यांचा समावेश आहे.