चित्रीकरणासाठी चार आठवडय़ांची मुदत
१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटादरम्यान बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा ठोठावलेल्या अभिनेता संजय दत्त याला बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने थोडा दिलासा दिला.
शिल्लक राहिलेली शिक्षा भोगण्यासाठी पोलिसांसमोर शरणागती पत्करण्यास एक दिवस शिल्लक असताना संजयच्या विनंतीवरून सर्वोच्च न्यायालयाने अर्धवट असलेल्या चित्रपटांचे काम पूर्ण करण्यासाठी चार आठवडय़ांची मुदत दिली आहे. संजय दत्तने सुमारे २७८ कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या चित्रपटांचे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा आणखी कालावधी मिळावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
शिल्लक राहिलेली शिक्षा भोगण्यासाठी संजय दत्त याला गुरुवारी पोलिसांपुढे हजर व्हायचे होते. मात्र न्यायालयाने मानवता दृष्टिकोनातून त्याला शरण येण्यासाठी आणखी चार आठवडय़ांचा कालावधी दिला आहे. संजय दत्तने मागितलेली सहा महिन्यांची मुदत देणे शक्य नाही तसेच यापुढे कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नसल्याचेही न्या. पी सतशिवम आणि न्या. बी. एस. चौहान यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
संजय दत्तला दिलासा
चित्रीकरणासाठी चार आठवडय़ांची मुदत १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटादरम्यान बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा ठोठावलेल्या अभिनेता संजय दत्त याला बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने थोडा दिलासा दिला.
First published on: 18-04-2013 at 05:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Releaf to sanjay dutt