रिलायन्स कम्युनिकेशन्सने आपल्या मोबाईल ग्राहकांना सोमवारी कॉलरेटवाढीचा धक्का दिला. जीएसएम आणि सीडीएमए या दोन्ही स्वरुपातील प्रीपेड ग्राहकांच्या कॉल दरामध्ये ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा सोमवारी करण्यात आली. त्याचबरोबर रिलायन्सच्या सर्वच प्लानमध्ये फेरबदल करण्यात आले असून, त्यामधूनही दरवाढ लागू करण्यात आली असल्याचे कंपनीच्या वायरलेस सेवा विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरदीप सिंग यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले.
देशभरातील सर्वच ग्राहकांसाठी ही वाढ लागू करण्यात आली असून, सर्वच प्रकारच्या सेवांच्या दरांमध्ये २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ही दरवाढ सोमवारपासूनच देशभरात लागू करण्यात आलीये. कंपनीचा नफा आणि मिनिटागणिक मिळणार महसूल या दोन्हींचा विचार करून ही दरवाढ करण्यात आली असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.
भारतातील खासगी मोबाईल सेवा पुरवणाऱया कंपन्या सध्या खूप अडचणीतून प्रवास करता आहेत. स्पर्धेच्या वाढत्या दबावामुळे अनेक कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्याचमुळे योग्यवेळी कॉल दरात वाढ करण्याचा निर्णय घेऊन देशभरातील ग्राहकांना दीर्घकालीन सुविधा पुरविण्याचा कंपनीचा मानस असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.
रिलायन्सचा कॉलदरवाढीचा धक्का!
रिलायन्स कम्युनिकेशन्सने आपल्या मोबाईल ग्राहकांना सोमवारी कॉलरेटवाढीचा धक्का दिला. जीएसएम आणि सीडीएमए या दोन्ही स्वरुपातील प्रीपेड ग्राहकांच्या कॉल दरामध्ये ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा सोमवारी करण्यात आली.
First published on: 06-05-2013 at 12:00 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance communications hikes mobile call rates by up to