उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने शुक्रवारी (३१ डिसेंबर) मोठा निर्णय घेतला. यानुसार रिलायन्सने अमेरिकेची सोलर बॅटरी कंपनी फॅराडिऑन विकत घेतली आहे. यासाठी रिलायन्सने १०० मिलियन जीबीपी म्हणजेच १,००० कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक केली आहे. रिलायन्स न्यू एनर्जी सोलर या कंपनीने फॅराडिऑनच्या खरेदीबाबत प्रक्रिया सुरू केली आहे. याशिवाय बाजारात कंपनीचा विस्तार करण्यासाठी रिलायन्स आणखी २५ मिलियन जीबीपी अतिरिक्त भांडवल गुंतवणार आहे. यामुळे भारतातील बॅटरी तंत्रज्ञानात मोठे बदल होतील असा अंदाज तज्ज्ञ वर्तवत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फॅराडिऑन जगातील आघाडीची बॅटरी उत्पादक कंपनी आहे. या कंपनीकडे सोडिअम आयन बॅटरी तंत्रज्ञानाचं पेटंट देखील आहे. या कंपनीचं सोडिअम आयन तंत्रज्ञान इतर बॅटऱ्यांच्या तुलनेत खूप पुढे आहे. लिथियम आयन आणि लिड अॅसिड बॅटऱ्यांपेक्षा सोडिअम आयन बॅटरी अधिक उपयोगी मानल्या जातात. फॅराडिऑनच्या सोडिअम आयन तंत्रामुळे आता रिलायन्सला बॅटरी निर्मितीत कोबाल्ट, लिथियम, कॉपर किंवा ग्रॅफाईटवर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही, अशी माहिती रिलायन्सने दिली आहे.

भारतात बॅटऱ्यांच्या किमतीत घट होण्याची शक्यता

१० ऑक्टोबरपासून रिलायन्सने आपल्या स्वच्छ उर्जा व्यवसायाला चालना देण्यासाठी सोलर, बॅटरी आणि हायड्रोजन या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत अनेक कंपन्यांची खरेदी केल्या आहेत. यामुळे रिलायन्सकडे या क्षेत्रातील अद्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झालं आहे. यामुळे आगामी काळात भारतात बॅटरी क्षेत्रात मोठे बदल पाहायला मिळतील आणि बॅटऱ्यांच्या किमतीतही घट होईल, असं जाणकार सांगत आहेत. याचा थेट फायदा सौरउर्जा क्षेत्रालाही होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : रिलायन्समध्ये मोठा नेतृत्वबदल होणार? खुद्द मुकेश अंबानींनीच दिले संकेत; म्हणाले, “आता…!”

रिलायन्सने नेक वॅफ, स्टर्लिंग अँड विल्सन, स्टाईसल आणि अंब्री याच्यासोबत भागिदारी करत १.२ बिलियन अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली आहे. यातून अक्षय ऊर्जा क्षेत्रात नवी परिसंस्था (renewable energy ecosystem) निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance going to buy uk based solar battery company faradion limite pbs