‘रिलायन्स जियो’ने त्यांची बहुप्रतिक्षित ‘४जी’ इंटरनेट सुविधा चाचणी स्वरुपात सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली केली आहे. याअंतर्गत पहिल्या तीन महिन्यांसाठी अनलिमिटेड ‘४जी’ इंटरनेट आणि फोन कॉल्सची सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर ‘जियो प्‍ले’, ‘जियो ऑन डिमांड’, ‘जियो मॅग’, ‘जियो बीट्स’ आणि ‘जियो ड्राइव्ह’ या त्यांच्या अन्य सुविधादेखील वापरकर्त्यास मोफत वापरता येणार आहेत. असे असले तरी कंपनीकडून यासाठी काही अटी घालण्यात आल्या असून, ‘रिलायन्स जियो’च्या मोफत ‘४जी’ इंटरनेट सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्यांची पूर्तता होणे गरजेचे आहे. रिलायन्सच्या कर्माचाऱ्यांकडून इन्व्हिटेशन मिळाल्यावरच ‘जियो ४जी’ सीमकार्ड मिळेल, ही यातील पहिली अट आहे. रिलायन्सचा कर्मचारी जास्तीत जास्त दहा जणांना इन्व्हाईट करू शकतो. इन्व्हिटेशन मिळाल्यावर २०० रुपये भरून हे सीमकार्ड प्राप्त होईल. दुसरी अट म्हणजे, या सीमकार्डच्या वापरासाठी रिलायन्सचा ‘लाईफ’ हा स्मार्टफोन खरेदी करणे गरजेचे आहे. हा फोन रिलायन्स डिजिटल स्टोअरमध्ये विकत घेता येईल. ५५९९ पासून १९४९९ रुपयांपर्यंतच्या विविध मॉडेल्समध्ये हा फोन उपलब्ध आहे.

Story img Loader