प्रयागराज : गंगा, यमुना आणि सरस्वतीचे पवित्र जल असलेल्या प्रयागराज येथील संगमावर आयोजित महाकुंभमध्ये लाखो भाविक सहभागी होतात. आत्मशोध आणि दैवी कृपा ही महाकुंभमध्ये सहभागी होण्याची एकदाच येणारी संधी असते. अनेकांसाठी हा प्रवास आव्हानात्मक असला तरी रिलायन्स उद्योग समूहाने सोयीसाठी ‘तीर्थ यात्री सेवा’ उपक्रम सुरू केला आहे. याद्वारे भाविकांची गैरसोय होऊ नये, हा यामागील उद्देशही आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आम्ही काळजी घेतो’ या तत्त्वानुसार, रिलायन्सद्वारे भाविकांना पौष्टिक अन्न आणि आवश्यक आरोग्य सेवा ते सुरक्षित वाहतूक आणि संदेश परिवहन सेवा सुलभ केली जात आहे.

जेव्हा आपण तीर्थ यात्रेकरूंची सेवा करतो तेव्हा आपल्यालादेखील आशीर्वादाचा लाभ होतो, असे म्हणतात. समूहातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा सहस्राकात एकदाच होणाऱ्या या कार्यक्रमात आध्यात्मिक यात्रेकरूंच्या गरजा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवतात, असे रिलायन्स उद्याोग समूहाचे संचालक अनंत अंबानी म्हणाले.

‘आम्हाला काळजी आहे’ या तत्त्वावर आमचा विश्वास असून जगातील सर्वात मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक समारंभ असलेल्या महाकुंभमेळ्यात, लाखो तीर्थ यात्रेकरूंचे आरोग्य, कल्याण आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याचा आणि त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि सोपा करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

समूहाची अष्टसूत्री

समुहाने अन्न सेवा, व्यापक आरोग्यसेवा, सुलभ प्रवास, पवित्र नद्यांवर सुरक्षा, आरामदायी विश्रांती क्षेत्रे, स्पष्ट दिशादर्शक, संपर्क माध्यम आणि रक्षकांना पाठिंबा या ‘अष्टसूत्री’चा अवलंब केला आहे. या अष्टसूत्रीमध्ये यात्रेकरूंना मोफत जेवण, पाणी, आरोग्य सुविधा, महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकीन, ज्येष्ठ नागरिकांसाठी इलेक्ट्रिक वाहने आणि ‘गोल्फ कार्ट’, नद्यांवर यात्रेकरूंना लाईफ जॅकेट, संवाद सुनिश्चित करण्यासाठी क्षेत्रांमध्ये नवीन ऑप्टिकल फायबर बसविणे आदींचा समावेश आहे.