पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या कर्जाला माफी देण्यासह कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर सवलती देण्याचा गांभीर्याने विचार करीत आहेत. येत्या दोन आठवड्यात कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकतो. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा हजार रूपये पाठवण्याच्या विचारात आहे. ही रक्कम बियाणे, शेती साहित्यासाठी देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठीच्या योजनेची घोषणा २६ जानेवारीला होण्याची शक्यता आहे.

ओडीसा सरकारच्या या योजनेवर पीएमओ गांभीर्याने विचार करत आहे. वित्त आणि कृषी मंत्रालयाध्ये या मॉडेलवर सातत्याने चर्चा सुरू आहे. ओडिसामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्षाला दहा हजार रूपये राज्य सरकारकडून टाकले जातात. त्यामुळे ओडीसा सरकारवर वर्षाला १.४ लाख कोटी रूपयांचा बोजा पडतो.

Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…
loksatta editorial centre to end no detention policy for students in classes 5 and 8 in schools
अग्रलेख: नापास कोण?
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
cm devendra fadnavis gharkul scheme
Devendra Fadnavis : सरकारी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
Shambhuraj Desai, tourism Maharashtra ,
महाराष्ट्राला पर्यटनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य बनवू, पर्यटनमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही
home prices increase due to gst
नवीन वर्षात घरे महागणार? सरकारच्या नव्या प्रस्तावामुळे घरांच्या किमती वाढण्याची भीती

केंद्र सरकारच्या योजनेत सरसकट सर्वच शेतकऱ्यांचा समावेश होणार नसल्याची शक्यता आहे. या योजनेतून भूमीहिन शेतकऱ्यांना वगळण्या येण्याची शक्यता आहे. भूमीहिन शेतकऱ्यांवर शेत कर्ज नसल्याचा तर्क यासाठी देण्यात आला आहे. सरकारी सुत्रांनुसार, पीएमओ नवीन ग्रामीण योजना आमंलात आणण्याचा विचार करत आहे. यासाठी मोदी सरकारने प्रत्येक राज्याकडून आणि मंत्रालयाकडून शेतकऱ्यांची आकडेवार मागितली आहे. दुसरा पर्याय म्हणून केंद्र सरकार तेलगंण मॉडेलची चाचपणी करत आहे. यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षातून दोन वेळेस प्रति एकर ४००० रुपये जमा करण्यात येतील. यासाठी सुमारे २ लाख कोटींची तरतूद करावी लागणार आहे.

सरकारने आधीच रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाला (आरबीआय) हंगामी लाभांशाची विचारणा केली असून येत्या दीड महिन्यांत जास्तीचा पैसाही बँकेकडे मागू शकेल. आरबीआयला तिच्याकडील गंगाजळीत किती पैशांची गरज आहे यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी लवकरच उच्चाधिकार समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीला २० दिवसांत तिचा अहवाल सादर करण्यास व बँकेकडून प्रचंड निधी सरकारला हस्तांतरीत करण्याचा मार्ग मोकळा करण्यास सांगितले जाईल.

नुकत्याच तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भाजपचा मोठा पराभव झाला असला तरी पक्षाच्या नेतृत्वाने त्याचा तपशिलाने आढावा घेतलेला नाही किंवा पराभवाची कारणे प्रसारमाध्यमांनाही सांगितली नाहीत. लोकसभेच्या निवडणुका फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील. त्यामुळे भाजपाचे नेतृत्व लोकसभा निवडणुकीच्या आधी वेगवेगळ््या घटकांना काही ना काही देण्याच्या दडपणाखाली आहे.

Story img Loader