गुजरातच्या तापी जिल्ह्यातील एका न्यायालयाने “गायीतून धर्माचा जन्म झाला, गोहत्या थांबली तर पृथ्वीवरील सर्व प्रश्न संपतील,” असं मत व्यक्त केलं. गुजरातमध्ये गायांची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या २२ वर्षीय आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावताना सत्र न्यायाधीश एस. व्ही. व्यास यांनी हे मत नोंदवलं. याबाबत लाईव्ह लॉ या कायदेविषयक संकेतस्थळाने वृत्त दिलं आहे.

न्यायाधीश व्यास म्हणाले, “धर्माचा जन्म गायीतून झाला आहे. कारण धर्म वृषभच्या रुपात आहे आणि गायीच्या मुलाला वृषभ म्हणतात.” यावेळी त्यांनी संस्कृतमधील एक श्लोक नमूद केला. यात म्हटलं आहे की, गायीचं अस्तित्व संपलं तर हे ब्रह्मांडही संपेल. वेदांच्या सर्व सहा भागाची निर्मिती गायीमुळे झाली आहे. त्यामुळे गोहत्या अस्वीकार्य आहे.

Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा

“स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. अशावेळी केवळ गोहत्या बंदी झालेली नाही, तर गोहत्या सर्वात टोकाला पोहचली आहे. चिडचिड आणि संताप वाढत आहे त्यामुळे आजचे प्रश्न निर्माण झाले आहेत. यामागचं एकमेव कारण म्हणजे गोहत्या आहे. जोपर्यंत संपूर्णपणे गोहत्या बंद होत नाही, तोपर्यंत सात्विक जलवायूचा प्रभाव होणार नाही,” असंही न्यायाधीश व्यास यांनी नमूद केलं.

हेही वाचा : गुजरात दंगल आणि नरेंद्र मोदींवरील ‘बीबीसी’चा माहितीपट Youtube आणि ट्विटरवर ब्लॉक, केंद्राच्या आदेशानंतर कारवाई

न्यायाधीश व्यास यांनी इतर दोन श्लोकांचाही उल्लेख केला. त्यात म्हटलं आहे, “जिथं गाय सुखी राहते तिथं धन आणि संपत्ती मिळते. जिथं गाय दुःखी आहे, तेथून धन आणि संपत्ती जाते. गाय रुद्राची आई, वसुची मुलगी, अदितीपुत्रांची बहिण आणि ध्रुरूप अमृताचा खजिना आहे.”

“ज्या दिवशी गायीच्या रक्ताचा एक थेंबही पृथ्वीवर पडणार नाही, त्या दिवशी पृथ्वीवरील सर्व प्रश्न संपतील आणि पृथ्वीचं कल्याण होईल,” असंही नमूद करण्यात आलं.

नेमकं प्रकरण काय?

मोहम्मद आमीन आरिफ अंजुम नावाच्या व्यक्तीला जुलै २०२० मध्ये एका ट्रकमधून १६ गायी आणि गोवंश घेऊन जाताना अटक झाली.