गुजरातमध्ये ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ या ख्रिश्चन संस्थेवर धर्मांतराचा आरोप करण्यात आला आहे. ही संस्था मदर तेरेसा यांनी स्थापन केली होती. या धर्मांतराप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या बालसुधारगृहात राहणाऱ्या मुलींना ख्रिश्चन बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वडोदरा शहरातील या बालगृहाविरोधात गुजरात धर्म स्वातंत्र्य कायदा, २००३ अन्वये हिंदू धार्मिक भावना दुखावल्याचा आणि अल्पवयीन मुलींना ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, संस्थेने हे आरोप फेटाळून लावले आहेत. जिल्हा सामाजिक सुरक्षा अधिकारी मयंक त्रिवेदी यांच्या तक्रारीवरून रविवारी मकरपुरा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नुकतीच जिल्ह्यातील बालकल्याण समितीचे अध्यक्ष मयंक त्रिवेदी यांच्यासह मकरपुरा भागातील मिशनरीज ऑफ चॅरिटी संचालित बालगृहाला भेट दिली होती.

एफआयआरमध्ये त्रिवेदी म्हणाले की, त्यांच्या भेटीदरम्यान त्रिवेदी यांना आढळले की “बालगृहातील मुलींना ख्रिश्चन धर्माकडे नेण्याच्या उद्देशाने ख्रिश्चन धार्मिक ग्रंथ वाचण्यास आणि ख्रिश्चन प्रार्थनांमध्ये भाग घेण्याची बळजबरी करण्यात आली होती. ही संस्था १० फेब्रुवारी २०२१ ते ९ डिसेंबर २०२१ या कालावधीत हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून काम करत आली आहे. मुलींना त्यांच्या गळ्यात क्रॉस बांधून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करत आहे. मुली वापरत असलेल्या स्टोअररूमच्या टेबलावर बायबल ठेवून त्यांना बायबल वाचायला भाग पाडण्याचे प्रयत्न करण्यात आले,” असं त्रिवेदी यांनी तक्रारीत म्हटलंय.

दुसरीकडे, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या व्यवस्थापनाने कोणतेही जबरदस्तीने धर्मांतर करण्यास नकार दिला आहे. मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या प्रवक्त्याने सांगितले- “आम्ही कोणत्याही धार्मिक परिवर्तनाच्या कार्यात सहभागी नाही. आमच्या बालगृहात २४ मुली आहेत. या मुली आमच्यासोबत राहतात आणि त्या अभ्यास करतात. आम्ही कोणाचेही धर्मांतर केलेले नाही किंवा कोणाला ख्रिश्चन धर्मात लग्न करण्यास भाग पाडले नाही.”

तक्रार मिळाल्यानंतर तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिकार्‍यांनी सांगितले की, बाल कल्याण समितीच्या तक्रारीनुसार, संस्थेने एका हिंदू मुलीला ख्रिश्चन परंपरेनुसार ख्रिश्चन कुटुंबात लग्न करण्यास भाग पाडले होते. निवारागृहात राहणाऱ्या मुलींना हिंदू असूनही मांसाहार दिला जात असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

“त्रिवेदी यांनी केलेल्या आरोपांची चौकशी समितीने केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थेविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत,” असे सहाय्यक पोलीस आयुक्त एस.बी. कुमावत यांनी सांगितले.