हैदराबाद येथे गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटांचा अमेरिकेने निषेध केला असून या स्फोटांच्या तपासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी हैदराबाद स्फोटांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या पीडितांना आदरांजली वाहिली असून देशवासीयांच्या वतीने स्फोटांचा निषेध केला आहे.
तत्पूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या स्फोटांचा निषेध केला असून भारत सरकारने विनंती केल्यास तपासात सहकार्य करण्याचे जाहीर केले आहे. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी अमेरिका भारताच्या सदैव पाठीशी राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
हैदराबादमध्ये गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटांचा पाकिस्तानने तीव्र निषेध केला असून कोणत्याही स्वरूपातील दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील शांततेला मारक असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानलाही दहशतवादाचे चटके सहन करावे लागले असल्याने गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटांमुळे भारतीयांना किती वेदना झाल्या असतील ते आम्ही समजू शकतो, असे परराष्ट्र कार्यालयातील प्रवक्ते मोअझ्झम खान यांनी म्हटले आहे.

Story img Loader