दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात वादग्रस्त विधान करणारे केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून हटवण्याचा आदेश निवडणूक आयोगानं भाजपानं दिला आहे. निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात अनुराग ठाकूर व परवेश साहिब सिंग या दोघांनाही स्टार प्रचारकाच्या यादीतून हटवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात या दोघांनी वादग्रस्त विधाने केली होती. या विधानांवरून प्रचंड वाद विवादही निर्माण झाले होते. निवडणूक आयोगाने या तक्रारींची दखल घेत संबंधित घटनेचा अहवालही मागवला होता. तर एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांनी तुम्ही सांगाल तिथं मी येतो मला गोळी घाला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

आणखी वाचा – “गोळ्या घालणार आहात त्या जागेचं नाव सांगा…येण्यास तयार”, ओवेसींचं अनुराग ठाकूर यांना आव्हान

राजधानी दिल्लीत निवडणूक प्रचाराची धामधूम सुरू असून आम आदमी पार्टी, भाजपा व काँग्रेस या तीन पक्षांत मुख्य लढत आहे. तिन्ही पक्षांनी दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे. भाजपाचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ठाकूर यांनी वादग्रस्त घोषणा दिली होती. या सभेत भाषण करताना अनुराग ठाकूर यांनी ‘देश के गद्दारों को..’ अशी घोषणा केली. त्यानंतर सभेला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी ‘गोली मारो *** को’ अशी घोषणाबाजी केली होती.

आणखी वाचा – केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त विधान; निवडणूक आयोगाने घेतली दखल

यानंतर निवडणूक आयोगाने अहवाल मागवला तसेच आपली बाजू मांडण्याचेही या नेत्यांना सांगितले. या घटनेनंतर एका दिवसानं आज निवडणूक आयोगानं कारवाई केली असून अनुराग ठाकूर व परवेश साहिब सिंग या दोन्ही नेत्यांची नावं स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्याचा आदेश दिला आहे.

Story img Loader