Nitin Gadkari: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी गोव्यातील वास्को येथे ४२०० कोटींच्या सहा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन केले. यानिमित्ताने दक्षिण गोव्याला जोडणारे रस्ते आणि आधुनिक सुविधा प्रदान केल्या जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी अतिक्रमणाविरोधातही नाराजी व्यक्त केली. रस्त्यावरी अतिक्रमण तात्काळ हटवून प्रकल्प मार्गी लावावेत. अन्यथा मी बुलडोझर लावून अतिक्रमण हटविण्याची व्यवस्था करतो, असा सज्जद दमच नितीन गडकरी यांनी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि राज्याचे मुख्य सचिव उपस्थित असताना नितीन गडकरी म्हणाले, “मी जेव्हा रस्त्याचे निरीक्षण करतो तेव्हा मला दिसते की, इथे सरकारी लोकांनीच अतिक्रमण केल्याचा संशय येतो. कारण रस्त्यांची रुंदी मला बरोबर वाटत नाही. रस्त्याचे काम करण्यापूर्वी त्याचे मोजमाप करा. जर कुणी अतिक्रमण केलेले असेल तर ते हटवा. जर ते अतिक्रमण हटविणार नसतील तर मला सांगा मी बुलडोझर लावून ते हटवतो.”

याशिवाय वारंवार अपघात होणारी ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) कोणती आहेत, ते एकदा ठरवून अपघात कमी कसे होतील, याचा प्रयत्न करावा. गोव्याला प्रदूषण आणि अपघात मूक्त करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्याने केले. यावेळी गडकरी यांनी केबल स्टेड उड्डाणपुलाचेही उद्घाटन केले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, भाजपाच्या डबल इंजिन सरकारने गोव्यातील पायाभूत सुविधांसाठी ४० हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. ५० वर्षाच जितका विकास झाला नाही, तो आम्ही १४ वर्षांत करून दाखवला आहे, असेही सावंत यावेळी म्हणाले. गडकरी यांनी भूमिपूजन केलेल्या प्रकल्पाचा गोव्याला पुढची २५ वर्ष लाभ मिळणार आहे. तसेच झुआरी उड्डाणपूल टॉवरवर फिरते रेस्टॉरंट स्थापन्याचे नियोजन लवकरच केले जाईल. यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक आकर्षित होतील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Remove encroachments or i will arrange bulldozers says nitin gadkari in goa kvg