वयाचे १८वे वर्ष लागलेल्या सर्वाना मताचा हक्क त्याच वर्षी निवडणूक झाल्यास मिळावा या हेतूने निवडणूक आयोगाने आता नवमतदार नोंदणीसाठी असलेली १ जून ही तारीख रद्द करण्याची सूचना केली आहे. याबाबत केंद्रीय कायदा मंत्रालयाला नियमात सुधारणा करावी अशी शिफारस त्यांनी केली आहे.
सध्याच्या निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ज्या व्यक्तीला १ जानेवारीला वयाची १८ वर्षे पूर्ण होतील त्याला मतदार यादीत नाव नोंदवण्याचा अधिकार आहे. मात्र जर २ जानेवारीला एखाद्याला १८ वर्षे होत असतील तर त्याला पुढील वर्षांपर्यंत नाव नोंदणीसाठी थांबावे लागले.
या दरम्यान जर निवडणूक आली तर हा कालावधी आणखी वाढतो. त्यामुळे नवमतदारांचा सहभाग वाढावा यासाठी १ जानेवारीची अट रद्द करावी अशी सूचना आयोगाने केली आहे. कायदा मंत्रालय निवडणूक आयोगाच्या प्रशासकीय बाबी पाहते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in